ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात केसांची जास्त काळजी घ्यावी लागते. या काळात दररोज केस धुतले तरी चिकट आणि रखरखीत होतात.
उन्हाळ्यात केसांचा चिकटपणा इतका वाढतो की, केस तेलकट दिसू लागतात. तेलकट केसांमुळे कोणतीच हेअर स्टाईल करता येत नाही.
उन्हाळ्यात तुमचे केसही घाम येतात आणि चिकट होतात. तर जाणून घ्या हे सोपे उपाय
केस धुतल्यानंतर, पाण्यात लिंबाचा रस मिसळा आणि त्याच पाण्याने केस धुवा. यामुळे चिकटपणा दूर होईल आणि कंडिशनर म्हणून काम करेल.
केसांचा कोरडेपणा आणि चिकटपणा दूर करण्यासाठी केसांवर तुम्ही अंड्याचा पिवळा भाग देखील लावू शकता. लावल्यानंतर १ तासाने केस धुवून टाका.
कोरफडीचा गर काढा आणि तो केसांवर लावा. केसांवर १ तास ठेवा आणि नंतर केस स्वच्छ धुवून घ्या. असे केल्यास केसांचा चिकटपणा निघून जाईल.
जर तुमच्या केसांना खूप घाम येत असेल तर, केस धुण्यापूर्वी नारळाचे तेल लावा. नारळाचे तेल केसांसाठी बेस्ट मानले जाते.
उन्हाळ्यात आठवड्यातून दोनदा केस धुवा. यामुळे केसांतील चिकटपणा टाळता येईल आणि घाम कमी होईल.
उन्हात बाहेर पडण्यापूर्वी, तुमचे केस स्कार्फने झाकून घ्या. यामुळे तुमचे केस सूर्यप्रकाशापासून वाचतील आणि घाम कमी होईल.