Sakshi Sunil Jadhav
लवकरच WhatsApp Web वरून थेट व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल करता येणार आहेत. ही अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे.
तुम्हाला या नव्या फीचरचा वापर करण्यासाठी तुमच्या मोबाईलची गरज भासणार नाही. हा खूप मोठा फायदा असणार आहे.
पुर्वी जर तुम्हाला पीसी किंवा लॅपटॉपवर वेगळं WhatsApp कॉल करायचा असेल तेव्हा अॅप डाउनलोड करावं लागायचं आता त्याची गरज नसेल. तुम्ही थेट वेबवरुन कॉल करु शकता.
युजर्सना Chrome, Edge सारख्या ब्राउजरमधूनच WhatsApp Web वापरून कॉल करता येणार आहे.
नव्या फीचरमध्ये एकाच वेळी तब्बल 32 लोकांपर्यंत ग्रुप कॉल करता येणार आहे. WhatsApp Web वरून ऑफिस मीटिंग, ऑनलाइन चर्चा किंवा मित्रांसोबत ग्रुप कॉल करता येतील.
युजर्स कॉल लिंक तयार करून ती कॉन्टॅक्ट्स किंवा ग्रुपमध्ये शेअर करू शकतील. चॅट विंडो बंद असली तरी ब्राउजरमध्ये कॉल नोटिफिकेशन दिसेल.
WhatsApp कॉल शेड्युल करण्याचा आणि ठरलेल्या वेळेला रिमाइंडर मिळण्याचाही पर्याय देणार आहे. त्यामुळे बिझनेस किंवा महत्वाच्या कामासाठी हे अॅप तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे.