Baba Vanga Gold Prediction: सोनं आणखी महागणार? बाबा वेंगांचे भाकित खरं ठरणार? जाणून घ्या किंमती

Gold Price Record: सोन्याच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. बाबा वेंगा यांची भविष्यवाणी पुन्हा चर्चेत आली असून, आर्थिक अस्थिरतेमुळे सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जात आहे.
Baba Vanga Gold Prediction
Gold Price Recordgoogle
Published On

सध्या सोनं विकत घेणं सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेलं आहे. सोन्या-चांदीच्या किमती दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. लग्नसराईच्या दिवसांमध्ये आता अनेक कुटुंबाना याचा फटका बसणार आहे. हे सर्वसामान्यांवर आलेलं जणू एक संकटच आहे. पण हे संकट येणार असं भाकीत आधीच भविषवक्त्या बाबा वेंगा यांनी केलं होत. हे भाकीत पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. अनेकांना ती खरी ठरतेय की काय, अशी शंका अजूनही वाटत आहे.

बाबा वेंगा यांना बाल्कन प्रदेशातील ‘नॉस्त्रेदमस’ म्हणून ओळखलं जातं. त्यांनी या आधी केलेल्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. त्यांचा जन्म 1911 साली बुल्गारियामध्ये झाला होता. 1996 मध्ये वयाच्या 86व्या वर्षी त्यांचं निधन झालं. लहानपणीच त्यांची दृष्टी गेली होती, मात्र त्यानंतर त्यांनी भविष्यातील घटनांबाबत केलेले अंदाज जगभरात प्रसिद्ध झाले. त्यामुळेच आज सोन्याच्या दरांमध्ये होत असलेली प्रचंड वाढ पाहून लोक बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीची आठवण काढत आहेत.

Baba Vanga Gold Prediction
कोणती बुलेट देते सगळ्यात जास्त मायलेज? जाणून घ्या Royal Enfield Bullet 350 ची सविस्तर माहिती

मागच्या काही महिन्यांमध्ये भारतात सोन्याच्या किमतींनी उच्चांक गाठलेला आहे. सध्या 10 ग्रॅम सोन्याचा दर जवळपास 1 लाख 47 हजार रुपयांपर्यंत गेला आहे. म्हणूनच लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा पर्यायही मोठ्या संख्येने निवडत आहेत. सुत्रांनुसार, जगभरातल्या अनेक केंद्रीय बँकांनी गेल्या दशकात मोठ्या प्रमाणावर सोन्याचा साठा वाढवला आहे. सध्या जागतिक कर्जाचा आकडा जवळपास 338 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचलेला आहे. हा आकडा जागतिक जीडीपीपेक्षा खूप जास्त आहे.

यामुळे सोनं ३० ते ४० टक्के वाढण्याची भीती अनेकांच्या मनात आहे. यामुळे सोनं सुरक्षित गुंतवणूक मानलं जात आहे. त्याची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे बाबा वेंगा यांनी केलेली सोन्याच्या किमतींविषयीची भविष्यवाणी खरी ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात सोन्याचे दर आणखी वाढणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Baba Vanga Gold Prediction
WhatsApp झालं पुन्हा अपडेट; व्हॉइस-व्हिडिओ कॉलसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com