Petrol Diesel Rate Today (24 Jan 2024) Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate Today (24 Jan 2024) : महाराष्ट्रातील या शहरांमध्ये बदलल्या पेट्रोल डिझेलच्या किंमती, वाचा आजचे नवीन दर किती?

Shraddha Thik

Petrol Diesel Price Today :

देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींच्या आधारे दररोज सुधारित केले जातात. आज सकाळी 6 वाजता देशातील सरकारी नेटवर्क कंपन्यांनी देशातील सर्व शहरांमध्ये त्यांचे दर अपडेट केले आहेत. अशा परिस्थितीत, कारची टाकी भरण्यापूर्वी, आज तुमच्या शहरात 1 लिटर पेट्रोल (Petrol) आणि डिझेलची किंमत किती आहे ?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. आजही राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

देशातील महानगरांमध्ये किंमत किती आहे?

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि डिझेलची किंमत 89.62 रुपये प्रति लिटर आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर इतका आहे.

कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये प्रति लीटर तर डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर इतका कायम आहे.

चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर इतका कायम आहे.

आज महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारने लादलेल्या व्हॅट करामुळे हा बदल झाला आहे.

पुणे

पेट्रोल 106.17 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.68 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 105.97 आणि डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 105.89 रुपये आणि डिझेल 92.42 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.47 रुपये आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर

इंडियन ऑइल अ‍ॅपद्वारे तुम्ही नवीनतम दर तपासू शकता. याशिवाय RSP कोड लिहून आणि 9224992249 या क्रमांकावर मेसेज करूनही नवीनतम किंमत जाणून घेऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडवर, सलमान खान धमकीनंतर गृह विभागाला निर्देश

Armaan Malik Accident: 'मरता मरता वाचलो...' बिग बॉस फेम अभिनेत्याच्या कारचा झाला अपघात; Video केला शेअर

मासिक पाळीविषयीचे समज आणि गैरसमज, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं, वाचा सविस्तर!

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT