तुळजाभवानी मंदिराच्या खजिन्यात मोठी भर; दोन वर्षांत ४९ किलो सोनं दान|VIDEO

Tuljabhavani Temple Receives 49 kg Gold Donation In Last 2 Years: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी गेल्या दोन वर्षांत ४९ किलो सोने आणि ६६२ किलो चांदी अर्पण करण्यात आली आहे.

बालाजी सुरवसे, साम टीव्ही

तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी भाविकांनी दानाचा ओघ कायम ठेवला आहे. सोन्याच्या दराने उच्चांकी पातळी ओलांडलेली असतानाही, गेल्या दोन वर्षांत देवीच्या खजिन्यात तब्बल ४९ किलो सोने आणि ६६२ किलो चांदीची मोठी भर पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या मार्च महिन्यातच १० किलोहून अधिक सोने दान स्वरूपात जमा झाले आहे. भाविकांच्या या दानामुळे तुळजाभवानी मंदिराचा एकूण सुवर्णसाठा आता २५३ किलोच्या पार गेला आहे. विशेष म्हणजे, सोन्याच्या वाढत्या किमतींचा कोणताही परिणाम भाविकांच्या श्रद्धेवर आणि दानावर झालेला दिसत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com