Petrol Diesel Rate  Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Rate Today: पेट्रोल डिझेलचे लेटेस्ट दर जाहीर; एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागणार?

Petrol Diesel Rate 17 June 2024: राज्यात रोज पेट्रोल डिझेलचे नवे दर अपडेट केले जातात. आज पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर.

Siddhi Hande

देशात रोज पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर होतात. पेट्रोल डिझेलच्या दरात घट होईल, अशी आशा सर्वसामान्यांना होती. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोल डिझेलच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहे.

रोज नागरिक ऑफिसला जाताना, काही वैयक्तिक कामांसाठी खाजगी वाहन वापरतात. खाजगी वाहनचालकांन पेट्रोल डिझेलचे दर माहित असणे गरजेचे आहे.पेट्रोल डिझेलचे दर कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. आज आतंरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइल ८०.४५ डॉलरवर विकले जात आहे. तर WTI क्रूड ऑइल ७८.४५ डॉलरवर विकले आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे नवे दर

दिल्लीत पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ८७.६२ रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल १०४.२१ रुपये लिटर विकले जात आहे तर डिझेल ९२.१५ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल १००.७५ रुपये लिटर आणि डिझेल ९२.३४ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. कोलकत्तामध्ये पेट्रोलची किंमत १०३.९४ रुपये प्रति लिटर तर डिझेलची किंमत ९०.७६ रुपये प्रति लिटर आहे.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे भाव

महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे भाव गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर आहेत. पुण्याच पेट्रोल १०३.६९ रुपयांवर विकले जात आहे तर डिझेल ९०.२३ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. ठाण्यात पेट्रोल १०४.०९ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९०.५९ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. नाशिकमध्ये पेट्रोलची किंमत १०३.८० रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.३४ रुपये प्रति लिटर आहे. नागपूरमध्ये पेट्रोल ९०.५१ रुपये प्रति लिटर तर डिझेल १०३.९४ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोल १०४.३४ रुपये लिटर तर डिझेल ९०.८६ रुपये लिटर विकले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana And Health : केळीच्या पानांचे, सालीचे हे जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Nanded : महालक्ष्मी सणासाठी आजोबांकडे आली; छतावर गेली असताना घडली दुर्दैवी घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

Manoj Jarange Patil: कितीही उपसमित्या बनवल्या तरी आरक्षण मिळवणारच, मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा

GST Reforms: विम्यावरील जीएसटी रद्द, प्रिमियम होणार स्वस्त, तुमचे पैसे किती वाचणार?

Ankita Walawalkar: जरतारी काठ, नऊवारी थाट मोगर गजरा साजे केसात...

SCROLL FOR NEXT