Petrol Diesel Price Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price: सप्टेंबरच्या दुसऱ्या दिवशी पेट्रोल डिझेलचे स्वस्त की महाग? जाणून घ्या

Petrol Diesel Price Today 2nd September 2024: सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेट्रोल डिझेलच्या भावात फारसा बदल झालेला नाही. जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर.

Siddhi Hande

देशभरात रोज सकाळी पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर होत असतात. पेट्रोलियम कंपन्या रोज सकाळी इंधनाचे भाव ठरवत असतात. त्यानंतर इंधनाच्या भावावर राज्यानुसार कर लादले जातात. त्यामुळेच पेट्रोल डिझेलचे भाव सतत वाढत आहेत. पेट्रोल डिझेलचे भाव कधी कमी होणार याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर पेट्रोल डिझेलचे भाव निश्चित केले जातात. आज WTI क्रूड ऑइल ७३.५५ डॉलर प्रति बॅलर विकले जात आहे तर ब्रेंट क्रूड ऑइल ७८.८० डॉलरवर विकले जात आहे.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबईत पेट्रोल १०३.४४ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ८९.९७ रुपये आहे.पुण्यात पेट्रोलची किंमत १०४.१२ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.६४ रुपये आहे. नाशिकमध्ये पेट्रोल १०३.०८ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.३४ रुपये आहे. नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत १०४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.५६ रुपये आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल १०४.६७ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९१.२१ रुपये आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोल १०५.१० रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९१.३४ रुपये आहे.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे दर

नवी दिल्लीत पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ८७.६२ रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत १०४.९५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.७६ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल १००.८५ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९२.४४ रुपये आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: रात्री झोपताना गाणी ऐकण्याचे फायदे!

Maharashtra News Live Updates : बाप्पा मला पावणार! सदा सरवणकर यांना विजयाचा विश्वास

Maharashtra Politics : लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा, बारामतीत अजित पवार काय म्हणाले?

Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहला प्लेइंग ११ मधून बाहेर का ठेवलं? समोर आलं टेन्शन वाढवणारं कारण

Sambhajinagar News : पगार थकल्याने ग्रामपंचायत कर्मचारी आक्रमक; ग्रामपंचायत कार्यालयात केली तोडफोड

SCROLL FOR NEXT