kolhapur Traffic Routes: राष्ट्रपती उद्या कोल्हापूर दौऱ्यावर, शहरात मोठा वाहतूक बदल, पाहा कोणता मार्ग बंद, कोणता सुरु?

kolhapur Traffic Routes changes : देवीच्या दर्शनासाठी द्रोपती मुर्मू या अंबाबाई मंदिरात येणार असल्याने भाविकांनी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मंदिरात येणं टाळावं, असे सांगण्यात आलेय.
Droupadi Murmu
President Droupadi MurmuSaam Tv
Published On

kolhapur News : भारताच्या राष्ट्रपती द्रोपती मुर्मू 2 सप्टेंबर 2024 रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रपती द्रोपती मुर्मू करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यासाठी शहरातील वाहतूकीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलाय. त्याशिवाय राष्ट्रपतींच्या दौऱ्यावेळी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी भाविकांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने आवाहन केलेय. देवीच्या दर्शनासाठी द्रोपती मुर्मू या अंबाबाई मंदिरात येणार असल्याने भाविकांनी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मंदिरात येणं टाळावं, असे सांगण्यात आलेय.

भारताच्या राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांचा कोल्हापूर विमानतळ ते श्री अंबाबाई दर्शन ते सर्कीट हाऊस ते ताराराणी चौक ते तावडे हॉटेल ते वारणानगर कोडोली ते परत कोल्हापूर विमानतळ असा दौरा मार्ग असणार आहे. तसेच इतर अनेक राजकीय नेते उपस्थित असणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर विमानतळ ते श्री अंबाबाई दर्शन ते सर्कीट हाऊस ते ताराराणी चौक ते तावडे हॉटेल ते वारणानगर कोडोली ते परत कोल्हापूर विमानतळ या दरम्यानचे मार्गावर मोटार वाहनांची वाहतुक सुरळीत ठेवण्या करिता व नागरिक, पादचारी यांना सुरक्षितता प्रस्थापित व्हावी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये. याकरीता वन वे मार्ग शिथिल करणे, आवश्यकतेनुसार वाहतुक सुरु-बंद करणे अगर वळविणे आवश्यक आहे.

वन वे मार्गात शिथिलता :- खालील वन वे मार्ग हे मा. महामहीम राष्ट्रपती यांचा कॉनव्हॉय ये-जा करणेच्या कालावधी करीता व्हि.व्हि.आय. पी. यांचा कॉन्व्हॉय आणि बंदोबस्तातील शासकीय वाहने यांच्याकरीता शिथिल करण्यात येत आहेत.

१. दुर्गा सिग्नल चौक ते खाँसाब पुतळा चौक

२. खरी कॉर्नर ते मिरजकर तिकटी

३. बिनखांबी ते खरी कॉर्नर

४. मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर

• वळविण्यात आलेले मार्ग :-

१. बोरपाडळे हॉटेल येथुन कोडोली/वारणा च्या दिशेने येणारी सर्व प्रकारची वाहतुक कोल्हापूरच्या दिशेने वळविण्यात येईल.

२. शहापुर माले फाटा येथुन वारणा च्या दिशेने जाणारी सर्व प्रकारची वाहतुक ही माले गावाकडे किंवा यु टर्न घेवुन बोरपाडळे कडे वळविण्यात येईल.

३. कोडोली पोलीस ठाणे समोरील पोखले फाटा येथे वारणा च्या दिशेने कोणत्याही प्रकारची वाहतुक सोडली जाणार नाही त्यांना पोखले गावाकडे वळविले जाईल. किंवा यु टर्न घेवुन बोरपाडळेकडे वळविण्यात येईल.

४. प्लामाक फाटा कोडोली येथुन एकही वाहन वारणा कोडोलीच्या दिशेने सोडले जाणार नाही.

५. वारणा तालीम येथील बॅरीकेटींग पासुन एकही वाहन पुढे सोडले जाणार नाही.

६. माले गावातुन कोडोलीच्या दिशेने एकही वाहन सोडले जाणार नाही.

७. दानेवाडी फाटा येथुन कोडोलीच्या दिशेने एकही वाहन सोडले जाणार नाही.

८. म्हसोबा देवालय येथुन कोडोलीच्या दिशेने एकही वाहन सोडले जाणार नाही.

• बंद करण्यात येणारा महामार्ग :-

१. महामहीम राष्ट्रपती महोदय यांचा कॉनव्हॉय विमानतळ येथुन महालक्ष्मीकडे रवाना होताना एचएसपी ऑफिस समोर पुणेच्या दिशेने जाणारी आणि अथायु हॉस्पीटल च्या समोर कागलच्या दिशेने जाणारी पुणे बेंगलोर एनएच-४ महामार्गाची वाहतुक काही काळ थांबविण्यात येईल.

२. महामहीम राष्ट्रपती महोदय यांचा कॉनव्हॉय सर्कीट हाऊस येथुन तावडे हॉटेल मार्गे वाठार ब्रिज येथुन वारणा नगर करीता रवाना होताना लक्ष्मी टेकडी, एचएसपी ऑफिस, हॉटेल स्टायलँड, उंचगांव रेल्वचे ब्रिज येथे काही काळ पुणे- बेंगलोर एनएच-४ महामार्गाची पुणेच्या दिशेने जाणारी वाहतुक काही काळ थांबविण्यात येईल. तसेच पुणे बेंगलोर एनएच-४ महामार्ग वरील कागल कडे जाणारी वाहतुक ही किणी टोल नाका, शेर-ए-पंजाब धाबा समोर काही काळ अडविली जाईल.

३. महामहीम राष्ट्रपती महोदय यांचा कॉनव्हॉय वारणानगर वाठार ब्रिज मार्गे विमानतळ कडे जाताना पुणे-बेंगलोर एनएच-४. हायवेवरील कागलच्या दिशेने जाणारी वाहतुक किणी टोल नाका, शेर-ए-पंजाब धाबा, नागाव फाटा, सांगली फाटा ओव्हर ब्रिज, पंचगंगा ब्रिज येथे काही काळ थांबविण्यात येईल. तसेच पुणे बेंगलोर एनएच-४ महामार्ग वरील पुणे कडे जाणारी वाहतुक ही लक्ष्मी टेकडी, एचएसपी ऑफिस समोर काही काळ अडविली जाईल.

५. महामहीम राष्ट्रपती महोदय यांचा कॉनव्हॉय वारणानगर कडे जाताना आणि वारणा नगर कडुन विमानतळ कडे येताना यादरम्यान पुणे बेंगलोर, एनएच-४ हायवेवर असणा-या सर्व वाहनांनी महामार्गाचा वापर न करता पर्यायी मार्गाचा वापर करावा. या वाहनांना महामार्गावरुन पर्यायी मार्गाकडे वळविण्यात येईल.

• वारणानगर येथील कार्यक्रमाकरीता येणा-या नागरिकांकरीता पार्किंग ची सोय :-

वारणानगर येथे होणा-या कार्यक्रमाकरीता वारणा साखर कारखाना गाडी अडडा येथे पाकींगची सोय करण्यात आली आहे. या पाकींग करीता येणारी वाहने दिनांक ०२/०९/२०२४ रोजी सकाळी १०.०० वा. पुर्वीच येतील. १०.०० वा. नंतर वाठार ते वारणानगर आणि कोडोली ते वारणानगर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील. कोडोली कडुन कार्यक्रमाकरीता येणारी वाहने श्रीराम मंदिर, भारत गॅस कडुन गाडी अडडयाकडे पार्कींग करीता येतील. वारणा तालीम समोरील बॅरीकेटींग पासुन कोणतेही वाहन पुढे येणार नाही.

• इतर :- महामहीम राष्ट्रपती महोदयांचा कॉनव्हॉय विमानतळ ते श्री महालक्ष्मी मंदिर ते सर्किट हाऊस ते वारणानगर ते विमानतळ या दरम्यान येताना आणि जाताना संपुर्ण कॉनव्हॉय मार्गावर मा. महोदयांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन आवश्यकतेनुसार वाहतुक चालु बंद करण्यात येईल.

• नो पार्किंग झोन :-

राष्ट्रपती महोदयांचा व्हिव्हिआयपी दौरा सुरु होऊन संपेपर्यंत खालील मार्गांवर कोणतेही वाहन पार्क करण्यास मनाई आहे.

१. विमानतळ ते शाहु टोल नाका

२. शाहु टोल नाका ते केएसबीपी चौक ते ताराराणी चौक (रस्त्याच्या दोन्ही लेन)

३. ताराराणी चौक ते धैर्यप्रसाद चौक (रस्त्याच्या दोन्ही लेन)

४ . धैर्यप्रसाद चौक ते मा. जिल्हाधिकारी कार्यालय चौक (रस्त्याच्या दोन्ही लेन)

५. मा. जिल्हाधिकारी कार्यालय चौक ते दसरा चौक ते बिंदु चौक

६. बिंदु चौक ते मिरजकर तिकटी ते खरी कॉर्नर ते श्री महालक्ष्मी मंदिर .

७ धैर्यप्रसाद चौक ते सर्किट हाऊस

८. ताराराणी चौक ते तावडे हॉटेल वरील निर्देश हे दिनांक ०२/०९/२०२४ रोजी व्हिव्हिआयपी दौरा सुरु होवुन संपेपर्यंत फक्त कॉनव्हॉय मधील वाहना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com