पेट्रोल डिझेलचे दर घसरणार
कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यावर इंधनाच्या किंमती कमी होणार
कच्च्या तेलाच्या उत्पादन वाढ झाल्याने दरकपातीची आशा
सध्या महागाई खूप जास्त वाढत आहे. महागाईच्या जगात अनेक गोष्टींच्या किंमती वाढत आहेत.यामध्ये सोन्याचे दर, पेट्रोल डिझेलच्या भावात सतत चढ-उतार होताना दिसत आहे. पेट्रोल डिझेलचे दर गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर आहे. हे दर कमी होण्याची अपेक्षा सर्वसामान्यांना आहे. मात्र, असंही काहीही होत नाही. मात्र, आता सोन्याचे दर कमी होणार आहेत.
जूनपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर घसरणार
२०२६ मघ्ये कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण होणार आहे. त्यामुळे जून महिन्यापर्यंत तेलाचे दर कमी होतील परिणामी इंधनाचे दरदेखील कमी होती. जूनपर्यंत कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ५० डॉलरपर्यंत येऊ शकतात. असा अंदाज स्टेट बँकेच्या रिसर्च रिपोर्टमध्ये नोंदवण्यात आला आहे. २०२६-२७ मध्ये महागाई कमी होऊन रुपया मजबूत करण्यास आणि आर्थिक वाढ चालना मिळेल, असं अहवालात म्हटलं आहे.
स्टेट बँकेच्या अहवालानुसार, सौदी अरेबिया आणि रशिया या ओपेक प्लस देशांनी तेल उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत आहेत. सध्या भारतीय क्रूड ऑइलचे दर ६२.२० डॉलर बॅरलच्या आसपास आहे. हे भाव भविष्यात ५० डॉलरपर्यंत जातील.
दर कपात होणार
अहवालात दिलेल्या माहितीनुसार, जर कच्च्या तेलात १४ टक्क्यांनी घट झाली तर त्याचा परिणाम इंधन विक्रीवर होईल. महागाईचा दर ३.४ टक्क्यांनी खाली येऊ शकतो.त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.