Petrol Diesel price Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel price : ... तर पेट्रोल-डिझेल प्रति लीटर ५०-६० रूपयांवर येणार, सर्वसामान्यांना दिलासा देणारा दावा

Petro Diesel Price Will Drop: पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार असल्याचा दावा जेपी मॉर्गन या एजन्सीने केला आहे. कच्च्या तेलाच्या किंमती अर्ध्या होणार आहे. परिणामी इंधनाचे दरदेखील घसरणार आहे.

Siddhi Hande

पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होणार

कच्च्या तेलाचे दर निम्मे होणार

परिणामी इंधनाच्या किंमती अर्ध्या होण्याची शक्यता

पेट्रोल डिझेलच्या किंमती गेल्या अनेक महिन्यांपासून स्थिर आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत पण नाही आणि कमी पण होत नाही. परंतु पेट्रोलचे दर कमी व्हावेत, अशी वाहनधारकांची इच्छा आहे. दरम्यान, देशात पेट्रोल डिझेलचे दर कमी होऊ शकतात.अमेरिकन एजन्सी जेपी मॉर्गन यांनी याबाबत भविष्यवाणी केली आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती या ५० टक्के म्हणजे अर्ध्या कमी होतील, असं त्यांनी सांगितलंय.

अमेरिकन एजन्सी जेपी मॉर्गनने कच्च्या तेलाच्या किंमतीबाबत माहिती दिली आहे. २०२७ मध्ये ब्रेंट क्रूड ऑइलचे दर ३० डॉलर होऊ शकतात. यामागचे करण म्हणजे तेलाचा पुरवठा हा मागणीपेक्षा खूप जास्त आहे. याचा परिणाम भारतावरदेखील होणार आहे.

भारत देश कच्च्या तेलाच्या गरजेपेक्षा ८५टक्के जास्त तेल आयात करतो. यासाठी सरकारला मोठी रक्कम मोजावी लागते. दरम्यान, जर कच्च्या तेलाच्या किंमती निम्म्या झाल्या तर त्याचा परिणाम थेट पेट्रोल डिझेलवर होऊ शकतो.

पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्याचे कारण काय? (Petrol Diesel Price Drop Reasons)

जेपी मॉर्गनच्या मते, पुढच्या तीन वर्षात तेलाचा वापर आणखी वाढेल. तेलाचे उत्पादनदेखील वाढेल. ओपेकसह अनेक देश कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवणार आहे. या वाढीव उत्पन्नामुळे बाजारात भर पडणार आहे. यामुळे पेट्रोलच्या किंमती कमी होतील. जेपी मॉर्गनच्या रिपोर्टनुसार, यानंतर जागतिक तेलाची मागणी दररोज ०.९ दशलक्ष बॅरलने वाढेल. ज्यामुळे तेलाचा वापर १०५. दशलक्ष बॅलर होईल.

किंमती कुठे कमी होणार?

जेपी मॉर्गनच्या अंदाजानुसार, २०२७ पर्यंत तेलाच्या किंमती ४२ डॉलरपर्यंत घसरु शकतात. वर्षाअखेरीस हे दर ३० डॉलरच्या खाली येऊ शकतात. ब्रेंट क्रूड ऑइलच्या किंमती प्रति बॅरल ६० डॉलरच्या वर आहेत. त्या अर्ध्या होतील. परिणामी सरकारी खर्च कमी होईल. तेल कंपन्यांनादेखील फायदा होईल. यामुळे पेट्रोल डिझेलचे दरदेखील अर्धे होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राजगुरुनगर नगरपरिषदेतील कामगारांचं आंदोलन!

Ticket To Finale Winner: 'या' स्पर्धकाची BB19 च्या ग्रँड फिनालेमध्ये डायरेक्ट एन्ट्री; मिळाली खास पॉवर

Protein Shake Recipe : घरच्या घरी हेल्दी चॉकलेट प्रोटीन शेक बनवण्याची सोपी रेसिपी

'आयुष्यात पोकळी..' धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनींची भावनिक पोस्ट, मन केले मोकळे

Crime : २ कोटींची लाच मागितल्याने निलंबन, पण PSI काही सुधारला नाही, पैसे डबल करून देतो सांगितलं अन्...

SCROLL FOR NEXT