Gold Rate Prediction: सोन्यात आता ५ लाख गुंतवले तर २०३० मध्ये किती रिटर्न मिळणार? वाचा कॅल्क्युलेशन

Gold Investment Expected Return After 5 Years: सोने खरेदी करणे ही एक गुंतवणूक असणार आहे. तुम्ही जर आता सोने खरेदी केले तर तुम्हाला पुढच्या ५ वर्षात किती रिटर्न मिळणार आहे ते जाणून घ्या.
Gold Rate Prediction
Gold Rate PredictionSaam Tv
Published On
Summary

सोन्याचे दर अजून वाढणार

पुढच्या ५ वर्षात सोन्याचे दर डबल होणार

आता सोने खरेदी केले तर ५ वर्षात किती रिटर्न मिळणार?

सध्या फक्त दागिन्यांसाठी सोने खरेदी केले जात नाही तर सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. सोने खरेदी करणे हे फायद्याचे दिसत आहे. सध्या सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. सोन्याचे दर जवळपास सव्वा लाखांच्यादेखील पुढे गेले आहे. २०२५ मध्ये सोन्यातील गुंतवणूक ही शेअर मार्केटपेक्षा कमी नाहीये. सुरक्षित गुंतवणूकीसाठी सोने हा बेस्ट पर्याय आहे. दरम्यान, सोन्याचे भाव अजून वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सोन्यात आताच गुंतवणूक करा असं अनेकांनी सांगितले आहे. जर तुम्ही आता सोन्यात गुंतवणूक केले तर तुम्हाला ५ वर्षांनी किती रिटर्न मिळणार आहे याबाबत जाणून घ्या.

Gold Rate Prediction
Gold- Silver Price: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० तोळे १७,४०० रुपयांनी स्वस्त; वाचा २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर

सोन्याची चकाकी वाढतेय (Gold Price Rising)

लग्नसराईच्या सीझनमध्ये सोन्याला खूप मागणी असते. त्यामुळेच सध्या सोन्याचे दर वधारलेले दिसत आहे. सोन्याच्या दरात हजारो रुपयांनी वाढ होत आहे. सध्या सोन्याचे दर १,२८,९०० रुपये प्रति तोळा आहे. सोन्याच्यासोबतच चांदीचेही दर वाढताना दिसत आहे. त्यामुळे सोने खरेदी करणे हे भविष्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.

आता सोने खरेदी केल्यावर किती रिटर्न मिळणार? (If you buy gold today what return do you expect after 5 year)

२५ वर्षांपूर्वी २४ कॅरेट सोन्याचे दर ४,४०० रुपये होते. हे दर आता १.२५ लाख झाले आहेत. मागच्या २५ वर्षात सोन्याचे दर २५ ते ३५ टक्के वाढल्याचे दिसत आहे. मार्केट एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार, सोन्यातील गुंतवणूक चांगले रिटर्न देते. जर तुम्ही आता सोने खरेदी केले तर तुमचे पैसे डबल होऊ शकतात. जर तुम्ही आता ५ लाखांचे सोने खरेदी केले तर २०३० पर्यंत याची किंमत १० लाख होऊ शकते.

Gold Rate Prediction
Gold Rate Today: आठवड्याभराच्या घसरणीनंतर पुन्हा सोनं महागलं; १० तोळ्यामागे १८,६०० रुपयांची वाढ; वाचा आजचे भाव

काही रिपोर्टनुसार, सोन्याचे दर असेच वाढत राहिले तर १ तोळा सोन्याचे दर २०३० मध्ये २,५०,००० होऊ शकतात. काही रिपोर्टनुसार सोन्याचे दर ७ ते ७.५ लाखांवर जाऊ शकतात. दम्यान, हे दर जागतिक बाजारपेठेतील बदलावर अवलंबून असणार आहे. मात्र, सोन्यातील गुंतवणूक ही नेहमी फायदेशीर ठरणार असा दावा केला जात आहे.

Gold Rate Prediction
Gold Rate Prediction: नव्या वर्षात सोनं आणखी महागणार! तोळ्यामागे ३५००० रुपयांची वाढ होणार; बँक ऑफ अमेरिकेचा दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com