Petrol Diesel Price Cut Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price Cut: आंनदाची बातमी! पेट्रोल डिझेल स्वस्त होणार; केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

Petrol Diesel Price Cut Soon: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता लवकरच पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किंमती जर स्थिर राहिल्या तर हा इंधनाचे दर घसरतील.

Siddhi Hande

देशात लाखो नागरिक रोज आपल्या खाजगी वाहनांचा वापर करतात. त्यामुळे रोज पेट्रोल डिझेलचा खर्च हा होतोच. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत. दरम्यान, आता या भावांमध्ये घट होण्याची शक्यता आहे. वाहनधारकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्रीय मंत्री हरदीप सिंह यांनी संकेत दिले आहेत. (Petrol Diesel Price To Drop)

पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होण्याची कारणे

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती जशा आहेत तशाच पुढच्या दोन ते तीन महिने राहिल्या तर इंधनाच्या दरात घट होऊ शकते. सरकारचा तेल आयात धोरणात मोठा बदल करण्याचे हे संकेत आहेत.

याअंतर्गत भारताने, कच्च्या तेलाचे पुरवठा करणाऱ्या देशांमध्ये वाढ केली आहे.आधी २७ देशातून कच्चे तेल आयात करत होते. आता ४० देशांमधून निर्यात केली जाईल. यामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा अजूनच मजबूत होईल, असं सांगण्यात येत आहे.

सध्या जागतिक पातळीवर दबाव असतानाही भारताला सवलतीच्या दरात तेल खरेदी करण्याचे स्वातंत्र्य आहे. याचा फायदा ग्राहकांना होण्याची शक्यता आहे.

हरदीप सिंग यांनी काय सांगितले?

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग यांनी सांगितले की, पुढील दोन-तीन महिने कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर राहिल्या तर भारतात इंधनाच्या किंमती कमी करण्यास वाव आहे. भारत वेगवेगळ्या ठिकाणांवरुन तेलाची आयात करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे तेल पुरवठा अधिक होईल. परिणामी इंधनाच्या किंमती कमी होतील, असं त्यांनी सांगितले.

भारताने कच्च्या तेलाच्या आयातीचा विस्तार केला

हरदीप सिंग यांनी सांगितले की, भारताने आपले तेल आयात करण्याच्या क्षेत्रात विस्तार केला आहे. आता कच्च्या तेलाच्या पुरवठा करण्याच्या देशांमध्ये वाढ करण्यात आली आहे. ४० देशांकडून तेल आयात केले जात आहे. तेल बाजारपेठेतील १६ टक्के वाढ ही भारतातून झाली आहे. पुढे ही वाढ २५ टक्क्यांपर्यंत वाढू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT