Petrol Diesel Rate  Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Rate 3rd June 2024: लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधी नागरिकांना दिलासा; वाचा पेट्रोल डिझेलचे नवे दर

Petrol Diesel Rate Today: राज्यात उद्या म्हणजेच ४ जून रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधी पेट्रोल डिझेलच्या भावात बदल झालेला आहे की नाही ते जाणून घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उद्या म्हणजेच ४ जून रोजी राज्यात लोकसभेच्या निवडणुकांचा (Loksabha Election Result) निकाल लागणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील महागाई कमी होईल, अशी आशा सर्वसामान्यांना होती. विशेषतः पेट्रोल डिझेलचे दर कमी होतील, असं सर्वांना वाटत होतं. मात्र, पेट्रोल डिझेलच्या भावात गेल्या काही दिवसांपासून काहीच बदल झालेला नाही.

आंतरराष्ट्रीय तेल कंपन्या रोज सकाळी पेट्रोल डिझेलचे (Petrol Diesel rate)दर जाहीर करतात.आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइल ८१.८६ डॉलरवर विकले जात आहे तर WTI क्रूड ऑइल ७७.८२ डॉलरवर विकले जात आहे. याचा परिणाम देशातील पेट्रोल डिझेलवर झालेला दिसत नाही. देशातील पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहेत.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल १०४.२१ रुपये प्रति लिटर तर डीझेल ९२.१५ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे. दिल्लीत पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटर तर डिझेल ८७.६२ रुपयांवर विकले जात आहे. कोलकत्यात पेट्रोल १०३.९४ रुपये तर डिझेल ९०.७६ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. चेन्नईत पेट्रोलचा दर १००.७५ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९२.३४ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे.

राज्यातील पेट्रोल डिझेलचे दर

पुण्यात पेट्रोल १०४.०८ रुपये प्रति लिटर विकले जात आहे तर डिझेल ९०.६१ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचे दर १०४.६८ रुपये तर डिझेल ९१.९० रुपयांनी विकले जात आहे. नागपूरमध्ये पेट्रोल १०३.९६ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९०.५२ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. ठाण्यात पेट्रोल १०३.९२ रुपये तर डिझेल ९०.४३ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल १०५.६६ रुपये तर डिझेल ९२.१६ रुपये प्रति लिटर विकले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Mayor Election: शिंदेंचं इकडे हॉटेल पॉलिटिक्स, तिकडे ठाकरेंचा डाव, BMC महापौरपदासाठी पडद्यामागे मोठ्या घडामोडी

Maharashtra Live News Update: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप सज्ज,ताकतीने लढण्याचा निर्धार

Gold Rate : चांदी ₹३५००० वाढली, तर सोनं प्रति तोळा ₹३३२० नं महागलं, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे लेटेस्ट दर

Valentine Day 2026 : लग्नानंतरचा पहिला 'व्हॅलेंटाईन डे' होईल खूपच खास, वाचा 'या' ५ रोमँटिक आयडिया

IND vs NZ: तिसरा वनडे सामना ठरणार निर्णायक; कोण जिंकणार सिरीज? पाहा कशी असेल भारताची प्लेईंग ११

SCROLL FOR NEXT