Nagpur : पेपर BA चा, प्रश्न RSS आणि हेडगेवार यांच्यावर; नागपूर विद्यापीठातील कारभारावर विद्यार्थी संतापले

Nagpur University Students : बीए अभ्यासक्रमाच्या परीक्षेत आरएसएस बद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. यावरून अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारले गेले असं म्हणत काही विद्यार्थ्यांनी यावर अक्षेप घेतला होता.
Nagpur University Students
NagpurSaam TV
Published On

पराग ढोबळे, नागपूर

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बीए अभ्यासक्रमाच्या परीक्षेत आरएसएस बद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. यावरून अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारले गेले असं म्हणत काही विद्यार्थ्यांनी यावर अक्षेप घेतला होता. या वादावर आता नागपूर विद्यापीठ इतिहास विषयावरील अभ्यास मंडळ, सदस्य, डॉ. सतीश चाफले यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

Nagpur University Students
Farmers Demands Kukadi Water : कुकडीच्या पाण्यासाठी आणे पठारावरील शेतकरी आक्रमक, आजपासून आंदाेलनास प्रारंभ

नागपूर विद्यापीठाच्या बीएच्या चौथ्या सेमिस्टरमधील अभ्यासक्रमात "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राष्ट्र निर्माणमध्ये भूमिका" हा मुद्दा 2021 पासूनच आहे. आजवर अनेक परीक्षांमध्ये या विषयावर आधारित प्रश्न ही विचारले गेले आहेत, असं डॉ.सतीश चाफले यांनी म्हटलं.

नेमकं काय घडलं?

दोन दिवसांपूर्वी बीएच्या चौथ्या सेमिस्टरच्या प्रश्नपत्रिकेत "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य" आणि "डॉ. हेडगेवार यांच्यावर टिपण" या दोन विषयांवर बीएच्या चौथ्या सेमिस्टरमध्ये प्रश्न विचारण्यात आले होते. यावरून मोठा वादही निर्माण झाला.

या प्रश्नासंदर्भात निर्माण झालेला वाद दुर्दैवी असल्याचे मत देखील डॉ. सतीश चाफले यांनी व्यक्त केले आहे. दोन्ही प्रश्न अभ्यासक्रमाचा भाग असून कुठेही अभ्यासक्रमाच्या बाहेरील प्रश्न विचारण्यात आलेला नाही असेही डॉ.चाफले म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राष्ट्र निर्माणमध्ये भूमिका या मुद्याचा समावेश बीएमध्ये इतिहासाच्या सेमिस्टरच्या अभ्यासक्रमात विचारपूर्वक करण्यात आला होता. त्यानंतर अनेकवेळा त्या विषयावर आधारित प्रश्न अनेक परीक्षेत आलेले आहे. मात्र कधीही कोणताही वाद झालेला नाही. तसेच यंदाही आतापर्यंत कुठल्याही विद्यार्थ्याने किंवा विद्यार्थ्यांच्या पालकाने या प्रश्नासंदर्भात आक्षेप नोंदवलेला नाही. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील एका परीक्षेतील प्रश्नासंदर्भात राजकीय वाद निर्माण करणं योग्य नसल्याचे मत ही डॉ.चाफले यांनी व्यक्त केलं आहे.

Nagpur University Students
Bomb Threat Mailed To Nagpur Airport: नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवणार, धमकीचा मेल; विमानतळावर मोठा गोंंधळ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com