Farmers Demands Kukadi Water : कुकडीच्या पाण्यासाठी आणे पठारावरील शेतकरी आक्रमक, आजपासून आंदाेलनास प्रारंभ

या आधी २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत १६ नोव्हेंबर पासून आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला होता.
junnar farmers demands kukadi water for farming
junnar farmers demands kukadi water for farmingsaam tv
Published On

Junnar News :

कुकडीचे पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे आणे पठारावरील शेतीसाठी उपलब्ध व्हावे यासाठी जुन्नर तालुक्यातील आणे पठारावरील आणे, नळवने, शिंदेवाडी, पेमदरा व आनंदवाडी येथील शेतकऱ्यांनी पठार विकास संस्थेच्या माध्यमातून आंदोलन सुरू केले आहे. (Maharashtra News)

junnar farmers demands kukadi water for farming
Nagpur News : सरकारच्या 'त्या' निर्णयाच्या निषेर्धात विदर्भातील परमिटरुम, बार आज बंद (पाहा व्हिडिओ)

गेल्या अनेक दिवसांपासून आणे पठारावरील शेतकरी कुकडी प्रकल्पाचे पाणी शेतीसाठी उपलब्ध व्हावे यासाठी लढा देत आहेत. त्यासाठी पठार विकास संस्थेच्या माध्यमातून स्थानिक लोक प्रतिनिधींपासून थेट मंत्रालयापर्यंत अर्ज व निवेदने सादर केली आहेत. परंतु शासकीय पातळीवरून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने आणे पठारावरील शेतकरी आक्रमक झाले आहेत.

या आधी २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत १६ नोव्हेंबर पासून आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यावर शासनाकडून ' आपल्या मागणीची शासकीय पातळीवरून दाखल घेण्यात आली असून त्यावर लवकरच कार्यवाही सुरू होईल. आपण आंदोलनाचा निर्णय मागे घ्यावा.' असे पत्र पठार विकास संस्थेस देण्यात आले होते. परंतु अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी गुरुवार पासून आंदोलन सुरू केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आता १९ नोव्हेंबर पर्यंत धरणे आंदोलन असेल त्यानंतर २० नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर पर्यंत साखळी उपोषण आणि एवढ्यावर शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास २३ नोव्हेंबर पासून मागणी पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण करण्यात येणार आहे अशी माहिती पठार विकास संस्थेचे सचिव विराज शिंदे यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

junnar farmers demands kukadi water for farming
Bhaubeej 2023: ते काळ ठरवेल, आमदाराच्या वक्तव्यानंतर स्वाभिमानीच्या महिलांनी प्रकाश आवाडेंना सुनावलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com