Personal Loan application process explained: Why banks ask for a blank cheque and what rules you must know saam tv
बिझनेस

Personal Loan चा अर्ज करताना बँक Blank cheque का मागते? काय आहे नियम, जाणून घ्या सर्वकाही

Blank cheque for Personal Loan: वैयक्तिक कर्जाचा अर्ज करताना बँकेला कोरा चेक अनिवार्य नाहीये. पण काही बँका किंवा एनबीएफसी त्यांच्या धोरणानुसार तुमच्याकडून तो मागू शकतात.

Bharat Jadhav

  • वैयक्तिक कर्जासाठी कोरा चेक देणे अनिवार्य नाही

  • काही बँका व एनबीएफसी त्यांच्या धोरणानुसार तो मागू शकतात

  • कोरा चेक फक्त स्वाक्षरी केलेला असतो, बाकी तपशील लिहिलेले नसतात

  • ग्राहकाला कोरा चेक न देण्याचा हक्क आहे.

आजकाल लोक त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेतात. बऱ्याचदा बँका आणि एनबीएफसी (नॉन-बँकिंग वित्तीय संस्था) वैयक्तिक कर्जासाठी अर्जदाराकडून कोरा चेक मागत असतात. पण ते अनिवार्य नसते. कोरा चेक म्हणजे फक्त स्वाक्षरी केलेला चेक ज्यावर रक्कम किंवा प्राप्तकर्त्याचे नाव यासारखे इतर तपशील लिहिलेले नसतात.

वैयक्तिक कर्ज घेताना कोऱ्या चेकची आवश्यकता समजून घेतल्यास तुम्हाला सहज मंजुरी आणि जलद वितरण मिळण्यास मदत होऊ शकते. कोऱ्या चेकवर फक्त खातेधारकाची स्वाक्षरी असते. पैसे घेणाऱ्या व्यक्तीबद्दल किंवा रकमेबद्दल कोणतीही माहिती नसते. कधीकधी त्यात तारीख देखील लिहिलेली असते. बहुतेक प्रकरणांमध्ये असे दिसून आले आहे, की प्राप्तकर्ता पैसे घेणाऱ्याचे नाव आणि रक्कम नंतर भरतो.

वैयक्तिक कर्जासाठी ब्लॅक चेक अनिवार्य नाही

वैयक्तिक कर्जासाठी ब्लॅक चेक अनिवार्य नाही, परंतु काही बँका किंवा एनबीएफसी त्यांच्या धोरणानुसार, तुमच्याकडे याची मागणी करू शकते. प्रत्यक्षात काही बँका आणि एनबीएफसी वैयक्तिक कर्ज देताना सुरक्षा म्हणून ब्लॅक चेक म्हणजेच धनादेश मागतात. हे बँक किंवा एनबीएफसीने ठरवलेल्या अटी आणि शर्तींवर अवलंबून असू शकते. बँका देय तारखेला कोरा चेक भरून तो कॅश करू शकतात, यामुळे त्यांचा धोका कमी होत असतो.

बँक तुमच्याकडून कोरा चेक का मागते?

बँका तुमच्याकडून कोरा चेक मागतात जेणेकरून तुम्ही वेळेवर पैसे भरू शकत नसाल तर ते त्यांच्या कर्जाची रक्कम वसूल करू शकतील. डिफॉल्टच्या स्थितीत कर्जाची परतफेड करण्यासाठी बँक किंवा एनबीएफसी कर्ज घेणाऱ्याच्या बँक खात्यातून थकीत रक्कम वसूल करण्यासाठी या चेकचा वापर करू शकतात.

बँकांचे पैसे वाया जाणार नाहीत याची खात्री देण्यासाठी ब्लॅक चेक आवश्यक आहेत. जरी डिजिटल बँकिंग व्यवहारांनी धनादेशांची जागा घेतली असली तरी,अनेक वित्तीय संस्था चुकलेल्या पेमेंटच्या बाबतीत बॅक-अप पर्याय म्हणून धनादेशांचा वापर करत आहेत. जर तुम्ही गोल्ड लोनसारखे सुरक्षित वैयक्तिक कर्ज घेतले तर बँकेला ब्लँक चेकची आवश्यकता नसते. कारण तुमचे सोने आधीच त्यांच्याकडे सुरक्षा म्हणून गहाण ठेवलेले असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT