तुम्ही पासपोर्ट काढण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल. पासपोर्टसंदर्भात केंद्र सरकारकडून महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट नियम सुधारणा नियम, २०२६ हे १७ सप्टेंबर रोजी भारताच्या राजपत्रात प्रकाशित केले आहेत. या नव्या नियमांनुसार १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना देण्यात येणाऱ्या ३६ पानांच्या सामान्य पासपोर्टच्या वैधतेबाबत नवा नियम लागू करण्यात आला आहे.
नव्या नियमानुसार, १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचा सामान्य पासपोर्ट जारी झाल्यापासून ५ वर्षे किंवा मुलाचे वय १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत यापैकी जी मुदत आधी संपेल तोपर्यंत वैध राहील. उदाहरणार्थ, एखाद्या मुलाचा पासपोर्ट १४व्या वर्षी बनवला, तर तो पाच वर्षांसाठी जारी झाला असला तरी मुलाचे १८ वे वर्ष पूर्ण होताच त्याची वैधता संपेल.
यासोबतच पासपोर्ट अर्जाचा शुल्काशी संबंधित नियमातही बदल करण्यात आला आहे. मात्र, सप्टेंबरमधल्या या नियमबदलामुळे शुल्क वाढलेले नाही. पासपोर्ट शुल्कात वाढ यापूर्वीच २० जून २०२६ रोजी करण्यात आली असून, नवीन दर १ जुलै २०२६ पासून लागू झाले आहेत.
३६ पानांच्या सामान्य पासपोर्टची फी १,५०० रुपयांवरून २,५०० रुपये, तर तत्काळ पासपोर्टची फी ३,५०० रुपयांवरून ५,००० रुपये झाली आहे. ६० पानांच्या सामान्य पासपोर्टसाठी २,००० ऐवजी ३,५०० रुपये, तर तत्काळ सेवेसाठी ४,००० ऐवजी ६,००० रुपये आकारले जात आहेत. ६० पानांचा पासपोर्ट हरवला किंवा खराब झाल्याने तत्काळ नव्या पासपोर्टसाठी आता ८,५०० रुपये शुल्क आहे.
१८ वर्षांखालील मुलांसाठी ३६ पानांच्या सामान्य पासपोर्टची फी १,७५० रुपये, तर तत्काळ सेवेसाठी ३,००० रुपये आहे. तसेच ८ वर्षांपर्यंतच्या मुलांना आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या जेष्ठ नागरिकांना नव्या पासपोर्टवर १० टक्के शुल्क सवलत मिळणार आहे. ही सवलत पासपोर्टच्या नूतणीकरण किंवा रिप्लेसमेंट अर्जासाठी लागू होणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.