Surabhi Jayashree Jagdish
गॅस, अॅसिडिटी किंवा संसर्गामुळे होणारी पोटदुखी अधूनमधून होते. याउलट पोटाच्या कॅन्सरची संबंधित वेदना कायम राहू शकतात. काही रुग्णांना सौम्य वेदना किंवा जळजळ जाणवू शकते. तसंच जेवल्यानंतर त्रास वाढणं किंवा थोडेसं खाल्ल्यानंतरही पोट भरल्यासारखं वाटणं अशी लक्षणं दिसू शकतात.
पोटाचा कॅन्सर असल्यास केवळ पोटदुखीच नाही तर विनाकारण वजन कमी होणं, सतत मळमळ, उलट्या, पोट फुगणं, थकवा आणि भूक कमी होणं अशी लक्षणंही दिसू शकतात. काही वेळा उलटीमध्ये रक्त येणं किंवा पचनाशी संबंधित इतर त्रासही जाणवू शकतात.
पोटाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं अनेकदा गॅस्ट्रायटिस, अॅसिड रिफ्लक्स किंवा Helicobacter pylori संसर्गामुळे होणाऱ्या त्रासासारखी वाटू शकतात. त्यामुळे सुरुवातीला सामान्य पचनाच्या समस्येवर उपचार केले जाऊ शकतात आणि लक्षणं कायम राहिल्यास पुढील तपासण्यांची गरज भासते.
पोटातील कॅन्सरची गाठ वाढल्यास पोटाच्या आतील आवरणावर सूज येऊ शकते किंवा पचनमार्गातील काही भाग अरुंद होऊ शकतो, त्यामुळे वेदना आणि अस्वस्थता वाढू शकते. पोटाच्या वरच्या भागातील गाठीमुळे गिळताना त्रास होऊ शकतो, तर खालच्या भागातील गाठीमुळे पोट फुगणे किंवा उलट्या होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
पोटदुखी दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकत, असेल जेवल्यानंतर वाढत असेल किंवा त्यासोबत थकवा आणि विनाकारण वजन कमी होणं अशी लक्षणं असतील तर वैद्यकीय तपासणी करून घेणं योग्य आहे.
फळं, भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश असलेला संतुलित आहार घेणं आणि प्रक्रिया केलेले तसंच अतिशय खारट पदार्थांचं सेवन मर्यादित ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. धूम्रपान टाळणं आणि अतिमद्यपानापासून दूर राहणंही पोटाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे.
बहुतेक वेळा पोटदुखी ही अल्पकाळ टिकणाऱ्या आणि गंभीर नसलेल्या कारणांमुळे होते. मात्र सतत राहणारा किंवा वाढत जाणारा त्रास दुर्लक्षित करू नये. पोटाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं सामान्य पचनाच्या समस्यांसारखी भासू शकतात, त्यामुळे लक्षणांमध्ये सातत्याने बदल होत असल्यास त्याची तपासणी करून घेणं महत्त्वाचं आहे.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.