रोजच्या 8 सवयी ज्या डोळ्यांसाठी घातक, वेळीच घ्या काळजी, नाहीतर...

Manasvi Choudhary

डोळे

डोळे हे मानवाचे सर्वात महत्त्वाचे आणि नाजूक अवयवांपैकी एक आहेत. परंतु, आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात अनवधानाने होणाऱ्या काही चुकीच्या सवयींमुळे डोळ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

eye care | pinterest

स्क्रीनसमोर तासनतास बसणे

मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरसमोर सतत तास न तास बसल्याने डोळ्यांवर अतिरिक्त ताण येतो, डोळे कोरडे पडणे, दृष्टी धूसर होणे आणि तीव्र डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात.

Excessive Screen Time

सनग्लासेस न घालणे

उन्हात बाहेर पडल्यानंतर सनग्लासेस न वापरल्यास सूर्याच्या हानिकारक अतिनील (UV) किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण होत नाही. यामुळे मोतीबिंदू (Cataract) आणि डोळ्यांच्या कर्करोगाचा धोका अधिक वाढू शकतो.

Not Wearing Sunglasses | Pintrest

वारंवार डोळे चोळणे

डोळे थकल्यानंतर किंवा जळजळ होत असल्यास अनेकांना डोळे चोळण्याची सवय असते. मात्र सतत डोळे दाबल्याने किंवा चोळल्याने डोळ्यांच्या कॉर्नियाला गंभीर इजा होऊ शकते.

Frequent Eye Rubbing | pinterest

कॉन्टॅक्ट लेन्सच्या स्वच्छतेचा अभाव

कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना योग्य स्वच्छता न राखल्यास किंवा अस्वच्छ लेन्स डोळ्यात ठेवल्यास जिवाणूंचा संसर्ग होऊन डोळ्यांच्या आरोग्याला मोठा धोका पोहोचू शकतो.

Lack of Contact Lens Hygiene | freepik.com

नियमित डोळ्यांची तपासणी न करणे

अनेक जण डोळ्यांची समस्या जाणवल्याशिवाय डॉक्टरांकडे जात नाहीत. ग्लुकोमा, मधुमेह रेटिनोपॅथी आणि वयोमानानुसार होणारे मॅक्युलर डिजेनेरेशन यांसारख्या गंभीर आजारांचे वेळे निदान करण्यासाठी नियमित डोळ्यांची तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Skipping Regular Eye Check-ups | Google

डोळे कोरडे पडणे

पाण्याचा अपुरा वापर, सतत स्क्रीनकडे बघणे किंवा हवेशीर वातावरणाचा अभाव यामुळे डोळे कोरडे पडण्याची समस्या वाढते, जी नंतर वेदनादायी ठरू शकते.

Dry Eyes | google

अपुरी झोप

रात्री उशिरापर्यंत जागी राहणे किंवा पुरेशी झोप न घेणे याचा थेट परिणाम डोळ्यांच्या स्नायूंवर होतो. झोपेच्या अभावामुळे डोळ्यांखाली वर्तुळे येणे, थकवा जाणवणे आणि डोळे लाल होणे असा त्रास होतो.

Lack of Sleep | pinterest

असंतुलित आहार

डोळ्यांच्या उत्तम दृष्टीसाठी व्हिटॅमिन ए, सी, ई आणि ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडयुक्त आहाराची गरज असते. आहारात पोषक तत्वांचा अभाव असल्या of डोळ्यांचे आरोग्य ढासळू शकते.

Unbalanced Diet | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Jaggery Tea Vs Sugar Tea: गुळाचा चहा की साखरेचा चहा? कोणता चहा तुमच्या आरोग्यासाठी बेस्ट?

Jaggery Tea Vs Sugar Tea
येथे क्लिक करा...