आता ऑनलाइन पद्धतीने सुरु करा बिझनेस
फक्त ५००० रुपयात करा सुरुवात
होईल लाखोंचा नफा
बिझनेस करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु बिझनेस करण्यासाठी जास्त भांडवल, काम करण्यासाठी माणसं आवश्यक असतात, असे अनेकांना वाटते. परंतु तुम्ही आता ऑनलाइन व्यवसाय सुरु करु शकतात. ऑनलाइन बिझनेस करुन तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकतात.
फक्त ५००० रुपयात सुरु करा बिझनेस (Start Online Business With only 5000 Rupees)
सध्या तुम्ही ऑनलाइन पद्धतीने कोणताही बिझनेस सुरु करु शकतात. फक्त ५००० रुपयांपासून तुम्ही व्यवसाय सुरु करु शकतात. यातून तुम्हाला चांगला नफादेखील मिळणार आहे.
रीसेलिंग बिझनेस (Reselling Business)
तुम्ही रिसेलिंगचा बिझनेस करु शकतात. यामध्ये तुम्हाला स्वतः चे प्रोडक्ट तयार करण्याची गरज नाही. तुम्हाला थेट सप्लायरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. यानंतर कॅटलॉग तयार करा आणि सोशल मीडियावर प्रमोशन करा. यामधून तुम्हाला मार्जिन मिळेल.
प्रिंट ऑन डिमांड बिझनेस (Print On Demand Business)
तुम्ही प्रिंट ऑन डिमांड बिझनेस सुरु करु शकतात.यामध्ये तुम्हाला टी-शर्ट,हुडी आणि फोन कव्हर कस्टमाइज करता येणार आहे. तुम्हाला फक्त या शर्टवर डिझाइन प्रिंट करुन द्यायची आहे. या बिझनेससाठी खूप कमी खर्च येतो.
एफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing)
एफिलिएट मार्केटिंग करण्याचा ऑप्शन तुमच्याकडे आहे. यामध्ये तुम्हाला ब्रँडचे प्रोडक्ट प्रमोट करायचे आहे. यामध्ये लिंकद्वारे जितके प्रोडक्ट विकले जातील त्याचे कमीशन तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही हा बिझनेस ब्लॉग, इन्स्टाग्राम, युट्यूब आणि व्हॉट्सअॅपद्वारे तुम्ही हा बिझनेस करु शकतात.
ऑनलाइन ट्यूशन (Online Tution)
तुम्ही ऑनलाइन पद्धतीने ट्युशन किंवा स्किल बेस्ड क्लासेस घेऊ शकतात. यामध्ये तुम्ही कोणताही विषय, सॉफ्टवेअर किंवा क्रिएटिव्ह स्कीलद्वारे घरबसल्या क्लासेस घेऊ शकतात. यासाठी फक्त कॅमेरा, मायक्रोफोन असा बेसिक सेटअप लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.