Bollywood : रक्ताने माखलेला टी-शर्ट... दिग्गज अभिनेत्याच्या मुलाच्या पोस्टनं वेधलं नेटकऱ्याचं लक्ष

Babil Khan : लोकप्रिय अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबिल खान काही महिन्यापासून सोशल मीडियापासून दूर होता. तो इंस्टाग्रामवर परतला आहे. सध्या त्याच्या पहिल्या पोस्टची मोठी चर्चा होत आहे.
Babil Khan
Babil Khanx
Published On
Summary
  • बाबिल खान सोशल मीडियावर परतला.

  • ब्रेकनंतर इंस्टाग्रामवर शेअर केले फोटो.

  • फोटोच्या कॅप्शनने वेधलं नेटकऱ्याचं लक्ष.

Babil Khan Instagram : दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबिल खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरुन बाबिलला ट्रोल केले जात होते. या ट्रोलिंगमुळे वैतागून त्याने सोशल मीडियापासून ब्रेक घेतला. आता ब्रेकनंतर बाबिल इंस्टाग्रामवर परतला आहे. त्याने स्वतःचे फोटो शेअर केले. फोटोंना दिलेल्या कॅप्शनची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.

'मी कधीही लपून काहीही ऐकण्याचा विचार केला नव्हता. घराच्या काचेच्या भिंती पातळ आहेत. मी माझे हृदय माझ्या बाहीवर घातले होते. आता माझ्याकडे रक्ताने माखलेला टी-शर्ट आहे. बरं होण्यासाठी मला वेळ हवा आहे. माझ्या राक्षसांनी मला खोल जखमा दिल्या आहे. भीतीने मला एक विचित्र कबुली द्यायला भाग पाडले आहे. या ओझ्यामुळे माझ्या आरोग्यावर खूप ताण आला आणि माझ्या आत्मा रेप्रेशनमुळे थकला आहे. तुम्ही तुमच्या प्रेयसीशी लढत आहात, मी माझ्या नैराश्याशी लढत आहे', असे कॅप्शन बाबिलने त्याच्या फोटोंना दिले आहे.

Babil Khan
Crime : चहासाठी घरी बोलवलं, काकांनी प्लान आखला होता, पुतण्या घरी येताच निर्दयीपणे संपवलं

बाबिल खानच्या पोस्टमधील पहिल्या फोटोमध्ये त्याच्या तोंडाजवळ एक फूल आहे, तर दुसऱ्या फोटोत त्याच्या समोर एक बाटली दिसते. त्याने फोटोंना दिलेल्या कॅप्शनची चर्चा होत आहे. नैराश्यातून बाहेर आल्यानंतरची त्याची पहिली इंस्टाग्राम पोस्ट आहे. या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत त्याला पाठिंबा दर्शवला आहे.

Babil Khan
Student Death : 10 हजारांची मागणी, पैसे न दिल्यानं बेदम मारलं; पोलीस कॉन्स्टेबलच्या मारहाणीत BTech विद्यार्थ्याचा मृत्यू

काही महिन्यांपूर्वी बाबिलने एकाच वेळी अनेक इंस्टाग्राम स्टोरीज पोस्ट केल्या होत्या. यात अनेक कलाकारांची नावे घेत त्याने बॉलिवूडमधील दबाव आणि आव्हाने यावर चर्चा केली होती. यादरम्यान तो नैराश्यात गेल्याचेही म्हटले जात होते. त्यानंतर बाबिलने त्याचे इंस्टाग्राम अकाउंट बंद केले. त्याच्या टीमने आणि कुटुंबीयांनी बाबिल सोशल मीडियापासून ब्रेक घेत असल्याचे सांगितले होते.

Babil Khan
Aanandi Joshi : तिचं क्लिव्हेज किती डिप... मराठी गायिकेला पुण्यातील डॉक्टरचा आक्षेपार्ह मेसेज; नाव अन् पत्ता शोधून...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com