One Nation One Gold Rate Saam Tv
बिझनेस

One Nation One Gold Rate: सोन्याचे दर लवकरच घसरणार? देशभरात असणार एकच भाव; काय आहे केंद्र सरकारचं नवं धोरण?

One Nation One Gold Rate Policy: देशात सर्व राज्यात आता सोन्याच्या किंमती सारख्या असणार आहेत. यासाठी 'वन नेशन वन गोल्ड रेट' पॉलिसी धोरण लागू केले जाणार आहे.

Siddhi Hande

देशात सोने-चांदीचे भाव सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. सध्या देशभरात विविध शहरांमध्ये सोने- चांदीचे वेगवेगळे भाव आहेत.सोने- चांदीच्या दरात राज्य सरकारच्या कराशिवाय इतर अनेक गोष्टी असतात. ज्यामुळे प्रत्येक राज्यात आणि शहरात सोन्याने वेगवेगळे भाव असतात. मात्र, आता संपूर्ण देशात सोन्याचा भाव एकच होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

देशात वन नेशन वन गोल्ड रेट धोरण लागू होणार आहे. त्यानंतर देशातील सर्व शहरातील ज्वेलर्सच्या दुकानात सोन्याने भाव सारखे होणार आहेत. देशभरातली सर्व बड्या ज्वेलर्सने या गोष्टीला सहमती दर्शवली आहे.

संपूर्ण देशात सोन्याच्या किंमती समान करण्यासाठी जेम अँड ज्वेलरी कौन्सिलने पाठिंबा दिला आहे. सप्टेंबर महिन्यात याबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.

काय आहे वन नेशन वन गोल्ड रेट पॉलिसी

वन नेशन वन गोल्ड रेट पॉलिसी ही भारत सरकारने प्रस्तावित केलेले धोरण आहे. देशात सर्व राज्यात सोन्याच्या किंमती समान असाव्यात हे यामागचे उद्दिष्ट आहे. यासाठी सरकार राष्ट्रीय लेबलवर बुलियन एक्सचेंज करेन. नॅशनल बुलियन एक्सचेंज संपूर्ण देशातील सोन्याचा भाव ठरवेल. शेअर मार्केटमध्ये एखाद्या शेअर्सची किंमती संपूर्ण देशात सारखीच असते.त्याचप्रमाणे सोन्याचे भाव पण एकसारखे असावे, यासाठी हे धोरण लागू केले जाणार आहे.

सध्या सोन्याचे दर सराफा बाजार संघटना ठरवतात. त्यामुळे हे प्रत्येक शहरासाठी वेगवेगळे असतात. परंतु नॅशनल बुलियन एक्सचेंज संपूर्ण देशात सोन्याचा एकच भाव ठरणार आहे.

सोन्याचे भाव कमी होणार?

देशात वन नेशन वन गोल्ड रेट पॉलिसीमुळे बाजारात पारदर्शकता वाढेल. त्यामुळे सोन्याच्या किंमतीतील फरक कमी होऊ शकतात.यामुळे सोन्याच्या विक्रीसाठी मनमानी करणाऱ्या ज्वेलर्सवर अंकुश ठेवता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT