Tax Saving Tips : तुमची बायकोही तुमचा टॅक्स वाचवू शकते! कसं काय? सोप्या टीप्स फॉलो करा

Tax Saving Tips While Filling ITR: आयटीआर फाइल करताना कर वाचवण्यासाठी करदाते अनेक मार्गांचा वापर करतात. जर तुम्हालाही कर वाचवायचा असेल तर या सोप्या टीप्स फॉलो करा.
Tax Saving Tips
Tax Saving TipsSaam Tv
Published On

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे. मुदतीआधी करदात्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करणे गरजेचे आहे.आयटीआर फाइल करताना तुम्ही कर वाचवू शकतात. कर वाचवण्यासाठी अनेक मार्ग आहेत ज्याचा तुम्ही सहज फायदा घेऊ शकतात. यामुळे तुमचा कर कमी होईल.

Tax Saving Tips
Petrol Diesel Rate Today: राज्यात पेट्रोल डिझेलचे भाव स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

तुम्ही तुमच्या बायकोच्या किंवा मुलांच्या नावावर तुमची मालमत्ता करु शकता. या परिस्थितीत आयकर कायद्यात क्लबिंग ऑफ इनकमची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच तुम्ही कर वातवू शकतात. पत्नीच्या खात्यात पैसै जमा करुन कर वाचवण्याची पद्धत क्लबिंग प्रोव्हिजन अंतर्गत येते. जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर कोणतीही गुंतवणूक केली किंवा त्यांच्या खात्यावर तुमचे पैसे जमा केले तर तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.

आयकर कायदा कलम ६० ते ६४ मध्ये क्लबिंग ऑफ इन्कमची तरतूद आहे. दुसऱ्याकडून मिळालेल्या उत्पन्नावर तुमच्या नावावर कर कापला गेला असेल तर त्याला क्लबिंग म्हणतात. हा नियम वैयक्तिक करदात्यांना लागू होतो. जर तुम्ही तुमच्या पत्नीला काही पैसे दिले अन् तिने ते फिक्स्ड डिपॉझिट, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले तर त्यातून मिळणारी रक्कम तुमच्या नावावर येत असेल तर तुम्हाला कर भरावा लागेल. जर तुमचे घर भाड्याने दिले असेल ती भाड्याची रक्कम तुमच्या अकाउंटवर येत असेल तर त्यातून मिळणारे उत्पन्नदेखील करमध्ये जोडले जाईल.

Tax Saving Tips
Honor Magic V3, Vs3 फोल्डेबल स्मार्टफोन सॅटेलाइटसह लॉन्च, जाणून घ्या किंमत

कर वाचवण्याचे मार्ग

जर तुमचे लग्न ठरले असेल आणि तुम्ही लग्नाआधी आपल्या पत्नीच्या नावावर काही मालमत्ता किंवा महागडी भेटवस्तू दिली तर त्यावर कर लागू होत नाही.

जर तुम्ही तुमच्या पत्नीला काही रक्कम दिली तर त्यावर कर लागू होत नाही. जर तुमच्या पत्नीने या पैशाची बचत केली तरीदेखील तुम्हाला कर भरावा लागत नाही.

जर तुमच्या पत्नीचे उत्पन्न कमी असेल तर तुम्ही तिच्या नावावर गुंतवणूक करु शकतात. यात म्युच्युअल फंड, मुदत ठेवचा समावेश आहे. त्यामुळे उत्पन्नावर कमी कर लागू होईल.

तुम्ही तुमच्या पत्नीच्या बचत खात्यात पैसे जमा करुन त्यावर कर वाचवू शकतात. बचत खात्यावर १०,००० रुपयापर्यंतची आयकर सूट आहे.

Tax Saving Tips
Royal Enfield ची सर्वात स्वस्त बाईक येतेय, 250cc इंजिनसह मिळणार जबरदस्त मायलेज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com