Open-Ended Mutual Funds: 'ओपन-एंडेड म्युच्युअल फंड' म्हणजे काय?, आरबीआयने का व्यक्त केलीय चिंता? जाणून घ्या

Open-Ended Mutual Funds: भारतात सध्या ३०० विविध म्युच्युअल फंड योजना सुरू आहेत. यात स्मॉल कॅपते ब्लू चिप म्युच्युअल फंड योजनांचा समावेश होतो. सध्या यामधील १७ म्युच्युअल फंड कंपन्यांच्या 24 योजनांबाबत भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) चिंता व्यक्त केली आहे.
Open-Ended Mutual Funds
Open-Ended Mutual FundsSaam Digital
Published On

Open-Ended Mutual Funds

भारतात सध्या ३०० विविध म्युच्युअल फंड योजना सुरू आहेत. यात स्मॉल कॅपते ब्लू चिप म्युच्युअल फंड योजनांचा समावेश होतो. सध्या यामधील १७ म्युच्युअल फंड कंपन्यांच्या 24 योजनांबाबत भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) चिंता व्यक्त केली आहे. या योजना तुम्हाला माहिती आहेत का? या योजनांमधून पैसे काढताना गुतवणूकदारांना जोखीम पत्करावी लागू शकते. या सर्व योजना ओपन एंडेड योजना आहेत. आज आपण याच ओपन एंडेड योजना काय आहेत? क्लोज एंडेड योजना कशा वेगळ्या आहेत? यातील जोखीम काय असते? याविषयी जाणून घेणार आहोत.

सर्वात आधी आपण RBI ने 24 म्युच्युअल फंड योजनांबद्दल चिंता का व्यक्त केली आहे, हे जाणून घेऊया. एका आकडेवारीनुसार या योजनांमध्ये देशातील सामान्य लोकांच्या सुमारे १.७ लाख कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. तर एकूण म्युच्युअल फंड योजनांमध्ये 12.5 लाख कोटी रुपये जमा केले आहेत. फायनान्स क्षेत्रातील नवीन स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञानाचा वाढता कल यामुळे अलिकडच्या काळात या योजनांमध्ये गुंतवणूक वाढली आहे.

शेअर बाजाराचे करणाऱ्या सेबीने दिलेल्या माहितीनुसार, ओपन-एंडेड स्कीम ही एक म्युच्युअल फंड योजना असून कधीही गुंतवणूक सुरू करता येते आणि कधीही पैसे काढता येतात. त्यामुळे या योजनेत पैसे येत जात राहतात. त्यामुळे त्याची तरलता (लिक्विडिटी) खूपच सौम्य आणि मध्यम असते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

क्लोज-एंडेड म्युच्युअल फंड योजना?

ओपन-एंडेड म्युच्युअल फंड योजनांच्या अगदी उलट क्लोज-एंडेड योजना असून या योजनांचा फिक्स मॅच्युरिटी पीरियड असतो. कालावधी पूर्व झाल्यानंतर गुंतवणूक आणि एकूण परतावा गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा केला जातो. मात्र काही म्युच्युअल फंड कंपन्या त्यांच्या क्लोज-एंडेड स्कीम्स मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर ओपन-एंडेड स्कीममध्ये बदलतात. ज्यामुळे गुंतवणूकदारांना गुंतवणूक रिडीम करण्याचा किंवा आणखी गुंतवणूक करण्याचा पर्याय उलब्ध असतो.

ओपन-एंडेड म्युच्युअल फंड योजना कशा काम करतात?

ओपन-एंडेड म्युच्युअल फंड योजना प्रत्येकवेळी नवीन फंडाच्या रुपात बाजारात आणल्या जातात. एसआयपीद्वारे या योजनांमध्येही गुंतवणूक करता येते. या योजनेच खास वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूकदारांसाठी कोणतीही कालमर्यादा किंवा गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. म्युच्युअल फंडमधील काही कंपन्या गुंतवणूकदारांना त्यांच्या योजनांमध्ये गुंतवणूक वाढवण्याचा पर्यायही देतात.

Open-Ended Mutual Funds
Budget session 2023 : राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्चला सादर होणार; सर्वसामान्यांना काय मिळणार?

ओपन-एंडेडमध्ये जोखीम आहे का?

तसं पाहिलं तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं हाच एक मोठा धोका असतो. याला ओपन-एंडेड म्युच्युअल फंड योजना देखील अपवाद नाही.

ओपन-एंडेड योजनांमध्ये, एकाच वेळी मोठी गुंतवणूक केली जातो व एकाचवेळी खूप मोठी रक्कम काढले जाते. या परिस्थितीत, फंड व्यवस्थापकाला अनेकदा कमी किंवा नको असलेल्या किमतीत युनिट्स विकावे लागतात. यामुळे शेवटी गुंतवणूकदारांचंच नुकसान होतं.

ओपन-एंडेड म्युच्युअल फंड योजनांमधील आणखी एक जोखीम म्हणजे गुंतवणूकतारांच्या एनएव्हीच्या मूल्यातील दैनंदिन चढउतार. या योजना बर्‍याच प्रमाणात डेली कैश फ्लोवर अवलंबून असतात त्यामुळे त्या खूपच अस्थिर असतात.

Open-Ended Mutual Funds
Affordable Electric Car: बजेटमध्ये इलेक्ट्रिक कार घ्यायचा विचार करताय? हे पर्याय पाहाच!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com