Budget session 2023 : राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्चला सादर होणार; सर्वसामान्यांना काय मिळणार?

२७ फेब्रुवारीपासून ते २५ मार्चपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू राहणार आहे.
Budget session 2023
Budget session 2023Saam TV
Published On

Maharashtra Budget session : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर आता महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ९ मार्च रोजी सादर होणार आहे. साल २०२३-२४ मध्ये प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच सरकार अर्थसंकल्प सादर करणार आहे. (Latest Budget session 2023-24)

तसेच अर्थसंकल्पिय अधिवेशन येत्या २७ फेब्रुवारीपासून होत आहे. सध्या राज्यमंत्रीमंडळाचा विकास झालेला नाही. त्यामुळे वित्त खात्यासाठी राज्यमंत्री नाहीत. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी मार्च महिन्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला हवा होता.

मात्र आता तसे न झाल्यास शंभूराज देसाई, दिपक केसरकर यांपैकी कोणी एक राज्याचा अर्थसंकल्प सादर करू शकतात. २७ फेब्रुवारीपासून ते २५ मार्चपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू राहणार आहे.

८ मार्च रोजी आर्थिक पाहणीचा अहवाल सादर केला जाणार आहे.त्यानंतर ९ मार्च रोजी दुपारी २ वाजता अर्थसंकल्प सारद केला जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती.

Budget session 2023
Mumbai Budget 2023: 'वर्षावरुन कंत्राटदारांनी बनवलेले बजेट...' मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

तसचे आता समोर येणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पावर देखील टीका होत आहे. शिंदे फडणवीस सरकारचा हा अर्थसंकल्प आगामी निवडणुका लक्षात घेऊन केला जाणार तसेच नागरिकांसाठी महत्वाचे असलेले सिंचन, ऊर्जा, वैद्यकीय, शिक्षण याकडे दुर्लक्ष केले जाणार असं विरोधक म्हणत आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना काय मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com