इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर कोणताही व्यक्ती आयुष्यात खूप यशस्वी होऊ शकतो. परिस्थिती कितीही बिकट असली तरी त्यावर मात करुन जो व्यक्ती यशस्वी होतो त्याला आयुष्यात कधीच कोणीच मागे खेचू शकत नाही. असंच यश डोबिंवलीतील योगेशने मिळवलं आहे. योगेशने चार्टड अकाउंटंटच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.
योगेशने आपल्या मेहनतीने चार्टड अकाउंटंटची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. योगेश हा डोबिंवलीचा रहिवासी आहे. त्याची आई डोबिंवलीत भाजी विकते. कितीही गरीब परिस्थिती असली तरीही माणूस खूप यशस्वी होऊ शकतो हे योगेशने सिद्ध केले आहे.
योगेशे चार्टड अकाउंटंट झाल्यानंतर त्याने आपल्या आईला कडकडून मिठी मारली. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात नक्कीच पाणी येईल.
योगेश हा एका भाजीविक्रेत्या मावशींचा मुलगा आहे. त्याची आई गांधानगरमधील गिरनार मिठाई दुकानाजवळ भाजी विकते. त्याने खडतर परिस्थितीवर मात करुन यश मिळवले आहे. नीरा ठोंबरे या डोंबिवली जवळील खोणी परिसरात आपली दोन मुले विकास, योगेश व मुलगी सोनल सह राहतात .निरा ठोंबरे या डोंबिवलीतील गांधीनगर परिसरात गेल्या 22 ते 25 वर्षांपासून भाजीचा व्यवसाय करतात. योगेश नववीत असताना त्याचे वडील वारले .त्यानंतर योगेशची जबाबदारी संसाराचा गाडा हाकण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली मात्र हार न मानता पैशाची जुळवा जुळव करत त्यानी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला .अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नीरा यांनी मुलांचे शिक्षण पूर्ण करण्याचा निश्चय केला .मुलगा आकाश आणि मुलगी सोनल यांचे लग्न लावून दिले .लहान मुलगा योगेशला शिक्षणाची आवड होती .
त्यांनी कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा हार मानली नाही.योगेशने सीए बनायचं, असं मनात ठरवलं होतं. त्यानुसार नियोजन करून त्याने अभ्यास केला.आई नीरा यांच्या कष्टाची जोड त्याला मिळत गेली . त्यांच्या कष्टाच चीज योगेशने केले. रिझल्टच्या दिवशी म्हणजेच गेल्या सोमवारी सी ए च्या परीक्षेत पास झाल्याची माहिती मिळताच योगेशचा आनंद गगनात मावेनासा झाला .
@RavindraChavan या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर योगेश, तुझा अभिमान आहे.डोंबिवली पूर्व येथील गांधीनगर मधील गिरनार मिठाई दुकानाजवळ भाजी विकणाऱ्या ठोंबरे मावशींचा मुलगा योगेश चार्टर्ड अकाऊंटंट (C.A.) झाला. निश्चय, मेहनत आणि परिश्रमांच्या बळावर योगेशने खडतर परिस्थितीशी तोंड देत हे दैदीप्यमान यश मिळवलं आहे. त्याच्या या यशामुळे आलेले मावशींचे आनंदाश्रू लाखमोलाचे आहेत. C.A. सारखी अवघड परीक्षा पास करणाऱ्या योगेशचे कौतुक करावे तितके कमीच. योगेशच्या या यशाबद्दल एक डोंबिवलीकर म्हणून आनंद झाला, असं कॅप्शन दिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.