Success Story : २० वर्षे बँकेत नोकरी, ५० व्या वर्षी स्वतःचा व्यवसाय; देशातील सर्वात श्रीमंत महिला CEO बद्दल जाणून घ्या!

NYKAA CEO Falguni Nayar Success Story: इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर कोणताही व्यक्ती खूप यशस्वी होतो. अशीच मेहनत फाल्गुनी नायर यांनी केली. आज त्या देशातील सर्वात श्रीमंत महिला सीईओ आहेत.
NYKAA CEO Falguni Nayar Success Story
NYKAA CEO Falguni Nayar Success StorySaam Tv

प्रत्येक गोष्ट यशस्वीरित्या उभारण्यासाठी जिद्द आणि चिकाटी खूप महत्त्वाची असते. इच्छाशक्ती आणि मेहनत करुन व्यक्ती खूप यशस्वी होते. अशाच एक यशस्वी उद्योजिकेची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्या महिलेचं नाव आहे फाल्गुनी नायर. फाल्गुनी नायर या आज नायका या मेकअप ब्रँडच्या सीईओ आहे.

NYKAA CEO Falguni Nayar Success Story
ITR: आयटीआर भरल्यानंतर किती दिवसात मिळतो रिफंड? जाणून घ्या A TO Z माहिती

फाल्गुनी या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे. फाल्गुनी नायर यांनी शुन्यातून आपली कंपनी उभी केली आहे. फाल्गुनी यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९६३ रोजी मुंबई झाला. त्यांनी २० वर्ष बँकर म्हणून काम केले. कोटक महिंद्रा बँकेत त्यांनी सुरुवातीला काम केले. २० वर्षांचा अनुभव असतानाही फाल्गुनी यांच्या मनात बिझनेस करण्याची इच्छा होती.

नोकरी करताना त्यांना आयआयएम अहमदाबादमधून एमबीए केले. त्यानंतर त्यांना बिझनेस करण्याची कल्पना सुचली. वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी आपली जास्त पगाराची नोकरी सोडली अन् शुन्यातून बिझनेस उभारण्यास सुरुवात केली.

NYKAA CEO Falguni Nayar Success Story
Petrol Diesel Price: महाराष्ट्रात आज पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले की कमी झाले? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

२०१२ मध्ये फाल्गुनी यांनी नायका कंपनीची सुरुवात केली. नायका शब्द हा नायिका शब्दातून प्रेरित आहे. याचा अर्थ मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री.प्रत्येक महिला ही आपल्या आयुष्यात नायिका असते, असं फाल्गुनी यांना वाटायचे.

फाल्गुनी यांनी २०१२ मध्ये सर्वप्रथम ब्युटी वेलनेस उत्पादने विकण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरु केले. यात त्या यशस्वी झाल्या. त्यानंत २०२४ मध्ये त्यांनी NYKAA मध्ये १ दशलक्ष रुपयांची गुंतवणूक केली. यानंतर त्यांनी आपल्या कंपनीचा विस्तार केला.

फाल्गुनी नायर या भारतातील सर्वात श्रीमंत महिला सीईओ आहेत.त्यांची संपत्ती २१,६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांच्या कंपनीत १६०० हून अधिक लोकांची टीम काम करते.

NYKAA CEO Falguni Nayar Success Story
Success Story : २० वर्षांपूर्वी निर्णय घेतला अन् आता आयुष्याचं सोनं झालं; मूळचे केरळचे सोजन आता यूकेमध्ये संसद गाजवणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com