BMC Recruitment: तरुणांनो नोकरी शोधताय? मुंबई महापालिकेत सुरू आहे भरती;अर्ज कुठे आणि कसा करायचा? जाणून घ्या

BMC Recruitment 2024: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेत भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा ते जाणून घ्या.
BMC Recruitment
BMC RecruitmentSaam Tv
Published On

मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात रिक्ते पदे भरण्यात येणार आहे. फिजियोथेरपी या पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे.बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे या नोकरीबाबत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

BMC Recruitment
IDBI Bank Jobs 2024 : आयडीबीआय बँकेत तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल १९०००० हजार मिळणार पगार, आजच अप्लाय करा

राज्य सरकारअंतर्गत ही भरती केली जाणार आहे. पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४० हजार रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. ज्या उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल त्यांनी या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करावा.

या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. १८-३८ वयोगटातील उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करण्यात सांगितले आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे. यासाठी ८३८ रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. या नोकरीसाठी उमेदवाराने B.Sc Physiotherapy पदवी प्राप्त असणे गरजेचे आहे.

BMC Recruitment
NABARD Recruitment: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; NABARD मध्ये विविध पदांसाठी भरती;जाणून घ्या सविस्तर

या नोकरीसाठी मुंबई हे कामाचे ठिकाण असणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२४ आहे. या नोकरीसाठी तुम्हाला लोकमान्य टिळक महानगरपालिका, आवक जावक विभागात अर्ज पाठवायचा आहे. ज्या तरुणांना सरकारी नोकरी करण्याची आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

BMC Recruitment
Government Jobs 2024 [Updates]: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पोस्ट ऑफिस ते सरकारी बँकेत विविध पदांसाठी भरती; जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com