NABARD Recruitment: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; NABARD मध्ये विविध पदांसाठी भरती;जाणून घ्या सविस्तर

NABARD Recruitment Application Process: NABARD मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. ज्या तरुणांचे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि नोकरीच्या शोधात आहेत. ते उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
NABARD Recruitment
NABARD RecruitmentSaam Tv
Published On

सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. नाबार्डमध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीत १५० रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे.

नाबार्डमध्ये सहाय्यक व्यवस्थापक (ग्रेड ए) या पदासाठी भरती करण्यात येणार आहे. यात कम्प्युटर/आयटी, फायनान्स, कंपनी सेक्रेटरी, सिव्हिल इंजिनिअर, जियो इन्फोर्मेशन, फोरेस्टरी, फूड प्रोसेसिंग, स्टॅटेस्टिक,मास कम्युनिकेशन/मिडिया स्पेशलिस्ट या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

NABARD Recruitment
Government Jobs 2024 [Updates]: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पोस्ट ऑफिस ते सरकारी बँकेत विविध पदांसाठी भरती; जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

कॉम्प्युर/ आयटी पोस्टसाठी उमेदवाराने ६० टक्के गुणांसह कॉम्प्युचर सायन्स, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयात पदवी असणे गरजेचे आहे.

फायनान्स पदासाठी ६० टक्के गुणांसह फायनान्स, बँकिंग विषया पदवी असणे गरजेचे आहे. उमेदवाराने फायनान्स विषयात MBA/MMS केले असणे आवश्यक आहे.

कंपनी सेक्रेटरी पोस्टसाठी उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असावी. त्याचसोबत CS पूर्ण केले असावे.

सिव्हिल इंजिनियरसाठी सिव्हिल विषयात पदवी प्राप्त असणे गरजेचे आहे. ६० टक्के गुणांसह उमेदवार पास असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिकल इंजिनियर पदासाठी उमेदवाराने इलेक्ट्रिकल विषयात इंजिनियरिंग केले असावे.

NABARD Recruitment
PCMC Recruitment: १० वी पास उमेदवारांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; अशा पद्धतीने करा अर्ज

या नोकरीसाठी २१ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहे.नाबार्डने यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. लवकरच या नोकरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात या भरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे, असं सांगण्यात येत आहे.

NABARD Recruitment
IDBI Bank Recruitment: आयडीबीआय बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी पदभरती; मिळणार १,२०,००० रुपये पगार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com