Difference Between Old And New Tax Regime Saam Tv
बिझनेस

Old VS New Tax Regime: जुन्या की नव्या कोणत्या कर प्रणालीने तुमचा टॅक्स वाचेल, जाणून घ्या

Difference Between Old And New Tax Regime: गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात नवीन कर प्रणालीची घोषणा करण्यात आली होती. या कर प्रणालीनंतर प्रत्येक करदात्याला जुनी कर व्यवस्था आणि नवीन कर व्यवस्था यात निवड करावी लागणार आहे.

कोमल दामुद्रे

Old Tax Regime VS New Tax Regime:

१ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. यामध्ये एप्रिल महिन्यात आयकर विभागाने करदात्यांसाठी महत्त्वाची अपडेट दिला. जर तुम्ही नोकरदार असाल आणि तुम्ही वेळेवर कर भरावा लागेल.

गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात नवीन कर (Tax) प्रणालीची घोषणा करण्यात आली होती. या कर प्रणालीनंतर प्रत्येक करदात्याला जुनी कर व्यवस्था आणि नवीन कर व्यवस्था यात निवड करावी लागणार आहे.

या दोन कर प्रणालींपैकी कोणती करप्रणाली अधिक लाभ देईल. याशिवाय कोणती कर व्यवस्था सर्वोत्तम आहे. जुनी आणि नवीन कर प्रणालीमध्ये कोणती पद्धत निवडायची ते जाणून घेऊया.

1. नवीन कर प्रणालीवरील कर स्लॅब

  • नवीन टॅक्स स्लॅबमध्ये २.५ लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर (Salary ) कोणताही कर आकारला जाणार नाही.

  • वार्षिक पगार २.५ लाख ते ५ लाख रुपये असेल तर ५ टक्के कर आकारला जाणार आहे.

  • ५ लाख ते ७.५ लाख रुपये वार्षिक उत्पन्नावर १० टक्के कर आकारला जातो.

  • तसेच ७.५ लाख ते १० लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर १५ टक्के कर असतो.

  • जर करदात्याने वार्षिक १० लाख ते १२.५ लाख रुपये कमावले असतील तर त्याला २० टक्क्यांनी कर भरावा लागेल.

  • १२.५ लाख ते १५ लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळवणाऱ्या करदात्यांना २५ टक्के दराने कर भरावा लागतो.

  • ज्यांचे वार्षिक उत्पन्न १५ लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना ३० टक्के दराने कर भरावा लागेल.

2. जुन्या कर प्रणालीवरील कर स्लॅब

  • जुन्या कर प्रणालीमध्ये अडीच लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नव्हता.

  • ज्या करदात्यांची वार्षिक उत्पन्न २.५ लाख ते ५ लाख रुपये आहे. त्यांना ५ टक्के दराने कर भरावा लागेल.

  • त्याचवेळी वार्षिक पगार ५ लाख ते १० लाख रुपयांच्या दरम्यान असेल तर २० टक्के दराने कर भरावा लागेल.

  • वार्षिक उत्पन्न १० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास ३० टक्के कर आकारला जाईल.

3. किती कर कपात होईल?

  • नवीन कर प्रणालीच्या आयकर कायद्याच्या कलम 80c च्या अंतर्गत कोणतीही सूट मिळणार नाही. यासाठी करदाते स्टँडर्ड डिडक्शन अंतर्गत ५०००० रुपयांपर्यंत कर कपात घेऊ शकतात.

  • जुन्या कर प्रणालीमध्ये आयकर कायद्याच्या कलम 80c अंतर्गत कर सूट दिली जाते. यामध्ये १.५० लाख रुपयांपर्यंतचा कर लाभ मिळू शकतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही अनेक ठिकाणी गुंतवणूक (Investment) केली असेल तर तुम्ही जुनी कर प्रणाली निवडायला हवीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT