Tax Saving Tips : ७ लाखांच्या टॅक्सवर करता येणार बचत, ITR फाइल करण्यापूर्वी ६ टिप्स लक्षात ठेवा

Tax Saving Ideas : मार्च महिना संपण्यासाठी २ दिवस शिल्लक आहे. अशातच जर तुम्ही आयटीआर फाइल केला नसेल तर लगेच करा. अशातच टॅक्स भरताना आणि वाचवताना अनेकांना टेन्शन येते.
Tax Saving Tips, Tax Saving Ideas
Tax Saving Tips, Tax Saving Ideassaam Tv
Published On

How To Save Tax :

मार्च महिना संपण्यासाठी २ दिवस शिल्लक आहे. अशातच जर तुम्ही आयटीआर फाइल केला नसेल तर लगेच करा. अशातच टॅक्स भरताना आणि वाचवताना अनेकांना टेन्शन येते.

आयटीआरमध्ये करदात्यांच्या वार्षिक उत्पन्नाचा तपशील सादर केला जातो. यामध्ये करदात्यांनी त्यांच्या उत्पन्नावर कर जमा करणे अधिक आवश्यक आहे. आयकर कायदा १९६१ च्या कलमांतर्गत सरकार यावर सूट देते. ज्याबद्दल करदात्याला याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. जर तुमचेही वार्षिक उत्पन्न (Salary) ७ लाखांपर्यंत असेल तर या ६ मार्गांनी तुम्ही कर वाचवू शकता. तसेच १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर तुम्हाला शून्य कर भरावा लागणार आहे. कारण जुन्या कर प्रणालीमध्ये ५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त घोषित केले आहे. कर कसा वाचवाल जाणून घ्या.

जर तुमचा पगार १२ लाख रुपयांपर्यंत असेल तर तुमचा HRA 3.60 लाख रुपये, LTA 10,000 रुपये आणि फोनचे बिल 6,000 रुपये असेल. यामध्ये कलम १६ अंतर्गत पगारावर ५० हजार कमी करुन मिळतील. तसेच २५०० रुपयांपर्यंत (Money) प्रोफेशन टॅक्सवर सूट मिळेल.

कलम 10 (13A)अंतर्गत 3.60 लाख रुपये HRA आणि कलम 10 (5) अंतर्गत 10,000 रुपये LTA वर तुम्ही दावा करु शकता. या कपातीमुळे तुमचा करपात्र पगार ७,७१,५०० रुपयांपर्यंत येईल.

Tax Saving Tips, Tax Saving Ideas
Tax Savings : पत्नीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करुनही वाचवता येईल कर; वाचा काय आहे नियम?

जर तुम्ही एलआयसी, पीपीएफ, ईपीएफमध्ये गुंतवणूक केली असेल किंवा मुलांची फी भरली असेल तर तुम्हाला कलम 80C अंतर्गत १.५० लाख रुपयांच्या अतिरिक्त कपातीचा दाव करु शकता.

तुम्ही राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या टियर -१ योजनेत गुंतवणूक केली असेल तर 80CCD अंतर्गत ५००० हजारांच्या अतिरिक्त कपातीसाठी पात्र असाल. या दोन्ही कपातीनंतर तुमचे करपात्र (Tax) उत्पन्न हे ५,७१,५०० रुपये इतके होईल.

80D अंतर्गत तुम्हाला आरोग्य विमा पॉलिसीवर भरलेल्या प्रीमियमसाठी कर सवलतीचा दावा करण्याची परवानगी देते. तुम्ही स्वत:साठी,जोडीदारासाठी किंवा तुमच्या मुलांसाठी आरोग्य विम्याच्या प्रीमियमसाठी २५००० रुपयांचा दावा करु शकता.

Tax Saving Tips, Tax Saving Ideas
Professional Tax: तुमच्या पगारातून कापला जाणारा प्रोफेशनल टॅक्स आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर

ज्येष्ठ नागरिक पालकांच्या आरोग्य पॉलिसींवर भरलेल्या प्रीमियमसाठी ५०००० च्या अतिरिक्त कपातीचा दावा करु शकता. यामध्ये तुम्हाला ७५ हजार रुपयांच्या कपातीचा लाभ मिळेल, ज्यामुळे तुमचे उत्पन्न ४,९६,५०० रुपये इतके होईल.

1. या योजनेवर देखील मिळेल कर सूट

आयकर नियमानुसार सार्वजनिक भविष्य सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF), इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS), नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS), सुकन्या समृद्धी योजना (SSY), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)यावर ५ किंवा त्याहून अधिक कालावधीच्या एफडीसाठी कर बचत करता येईल. यामध्ये तुम्ही बचत करुन गुंतवणूक करुन कर सवलतीचा दावा करु शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com