Income Tax Return Form: तुमच्या उत्पन्नानुसार टॅक्स रिटर्नसाठी कोणता फॉर्म भरावा? जाणून घ्या सविस्तर

Which ITR Form Should Be Filled For Income Tax Return Know in Marathi: जर तुम्ही देखील आयकर रिटर्नचा फॉर्म भरणार असाल तर कोणता आयटीआर फॉर्म भरावा जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर
Income Tax Return Form
Income Tax Return FormSaam Tv

Income Tax Return Form :

१ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष देशभरात सुरु झाले आहे. यामध्ये एप्रिल महिन्यात आयकर विभागाने करदात्यांसाठी महत्त्वाची अपडेट दिली. टॅक्सचा फॉर्म आता ऑनलाइन (Online) पद्धतीने भरता येणार आहे.

यामध्ये आर्थिक वर्ष २०२३-२४ (AY 2024-25)साठी ITR-1, ITR-2 आणि ITR-4 फॉर्म भरु शकता. पण हे फॉर्म व्यावसायिक आणि लहान व्यावसायिकांसाठी आहेत.

इन्कम टॅक्स रिटर्न भरणे हे अंत्यत गरजेचे आहे. यासाठी अनेकजण व्यावसायिकांची मदत घेतात. जर तुम्ही देखील आयकर रिटर्नचा फॉर्म भरणार असाल तर कोणता आयटीआर फॉर्म भरावा जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

कोणता आयटीआर फॉर्म भरावा?

आयकर रिर्टनसाठी (Income Tax) अनेक प्रकारचे फॉर्म आहेत. जर तुम्ही चुकीच्या फॉर्मसह भरले तर तुमचा आयटीआर फॉर्म रद्द होऊ शकतो.

Income Tax Return Form
RBI Repo Rate 2024 : कर्जदारांच्या पदरी निराशाच!, पण काहीअंशी दिलासा; रिझर्व्ह बँकेने रेपो रेटसंदर्भात काय घेतला निर्णय?

1. ITR-1

जर तुमचे उत्पन्न (Salary) ५० लाखांपर्यंत असल्यास तुम्ही ITR-1 हा फॉर्म निवडू शकता. यामध्ये तुमच्या उत्पन्नाचे स्त्रोत हा पगार, कुटुंबाचे पेन्शन, निवासी मालमत्ता यातून असायला हवे. शेतीतून मिळणारे उत्पन्न ५००० रुपयांपर्यंत असले तरीही ITR-1 हा दाखल करता येतो. जर तुम्ही एखाद्या कंपनीत संचालक असाल किंवा तुमचे त्या कंपनीत शेअर्स असतील तर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार नाही. पगारदार व्यक्तींना त्यांच्या कंपनीकडून फॉर्म-१६ मिळाल्यानंतर आयकर रिटर्नचा फॉर्म भरता येईल.

2. ITR-2

जर तुमचे उत्पन्न हे ५० लाखांपेक्षा जास्त असेल तर हा फॉर्म भरु शकता. यामध्ये एकापेक्षा जास्त निवासी मालमत्ता, गुंतवणुकीवर झालेला फायदा आणि तोटा, १० लाख रुपयांपेक्षा जास्त लाभ आणि ५ हजारांपेक्षा जास्त शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहीती करदात्याला द्यावी लागणार आहे. तसेच पीपीएफचे व्याज मिळत असेल तरीही हाच फॉर्म भरावा लागणार आहे.

Income Tax Return Form
Petrol Diesel Rate (5th April 2024): महाराष्ट्रात आज पेट्रोल-डिझेलचा भाव किती? १ लीटर इंधनासाठी किती पैसे मोजावे लागतील?

3. ITR -3

तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल आणि त्यातून तुम्हाला चांगला फायदा होत असेल तर हा फॉर्म भरावा लागणार आहे. यामध्ये आयटीआर-१ आणि आयटीआर-२ मध्ये दिलेल्या सर्व उत्पन्नाची माहिती द्यावी लागणार आहे. तसेच शेअर्स, मालमत्ता विक्रीतून लाभ झाल्यासही हाच फॉर्म भरावा लागणार आहे.

4. ITR-4

आयटीआर-४ हा फॉर्म ५० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कंपन्यांसाठी आहे. ज्यांना 44AD, 44ADA किंवा 44E सारख्या कलमांतर्गत उत्पन्न मिळते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com