Ola Uber  Saam tv
बिझनेस

Ola Uber: ओला-उबर चालकांना हायकोर्टाचा दणका, राईड रद्द केल्यास प्रवाशांच्या खात्यात जमा होणार पैसे

Ola Uber Ride Cancel : हल्ली ओला-उबर बुक केले तरी ते लवकर येत नाही किंवा बरेचदा बुकिंग कन्फर्म करुनही ती रद्द केल्याचा मेसेज येतो.

कोमल दामुद्रे

Ola Uber Refuse Customer : पूर्वी प्रवास करण्यासाठी आपण काळी पिवळी अर्थात टॅक्सीचा वापर करायचो. पण हल्ली टॅक्सी म्हटलं की, सहज आठवते ती ओला उबर. कमी पैशात पण सुकर प्रवास होण्यासाठी आपण ओला उबरचा पर्याय निवडतो.

चांगला व सुकर प्रवास होण्यासाठी व लांबचा पल्ला व्यवस्थित गाठण्यासाठी आपण अनेकदा ओला, उबरने प्रवास करतो. अनेकांना प्रवास हा गर्दी किंवा गोंधाळाचा नको असतो. त्यामुळे आपल्याला ओला उबर ही सोयीस्कर ठरते.

परंतु, हल्ली ओला-उबर बुक (Book) केले तरी ते लवकर येत नाही किंवा बरेचदा बुकिंग कन्फर्म करुनही ती रद्द केल्याचा मेसेज येतो. अशावेळी स्वत:ला त्रागा करुन घेण्याशिवाय आपल्याकडे कोणताही पर्याय नसतो. पण प्रवाशांचे होणारे हाल आता लवकरच थांबतील अशी चिन्हे दिसून आली आहेत.

ओला-उबरची कॅब बुक केल्यानंतर प्रवाशाने बुकिंग रद्द केल्यास त्याला पैसे भरावे लागत होते. परंतु, अशीच तरतूद आता चालकासोबत होणार आहे. चालकांने बुकिंग कन्फर्म करुन ती रद्द केल्यास त्याला ५० ते ७५ रुपये (Money) भरावे लागतील अशी तरतूद करण्यात आली आहे. तसेच हे पैसे कॅब बुक करणाऱ्या प्रवाशांच्या खिशात जातील.

ओला उबर या सेवा कशाप्रकारे राबवतात नेमक्या कोणत्या नियमांखाली या सेवा सुरु आहेत. याबाबत उच्च न्यायलयाने अनेक प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर उच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर राज्य सरकारने समिती नेमली असून महाराष्ट्रात मोटार वाहन समुच्चक नियमावली बनवण्यात आली आहे. या नियमावलीचा प्रस्ताव लवकरच राज्य परिवहन आयुक्तालयाकडून राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर सरकारने मान्यता दिल्यानंतर तत्काळ निर्णय अंमलात येईल अशी माहिती समोर आली आहे.

तसेच नेहमीच्या टॅक्सीदरापेक्षा ओला उबरकडून अधिक पैसे उकळेल जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यावर जबर बसवण्यासाठी कमाल भाडे ठरविण्यात येणार आहे. याशिवाय जर चालकाला पिकअप लोकेशनवर पोहचण्यास उशीर झाल्यास चालकाला दंड देखील भरावा लागेल अशी तरतूदही करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

SCROLL FOR NEXT