Insurance Buying Tips : पहिल्यांदाच विमा काढताय? या गोष्टी तपासून मगच खरेदी करा

Best Insurance Buying Tips : विमा कंपन्यांकडून अशा अनेक अटी असतात ज्या सामान्य माणसाला समजणे खरेतर कठीणच.
Insurance Buying Tips
Insurance Buying TipsSaam tv
Published On

Buying Insurance Don't Forget These 5 Important Tips : बरेचदा विमा पॉलिसी घेताना आपल्याला अनेक प्रश्न पडतात. तो खरेदी करताना त्याच्या परतावा किती मिळेल व किती रक्कम भरावी लागेल असे अनेक प्रश्न तुम्हालाही पडलेच असावेत. विमा कंपन्यांकडून अशा अनेक अटी असतात ज्या सामान्य माणसाला समजणे खरेतर कठीणच.

परंतु, काही गोष्टी पद्धतशीरपणे समजून घेतल्या तर या विमा पॉलिसीच्या अटी व नियम सहज समजू शकतात. जर तुम्ही पहिल्यांदाच विमा काढत असाल तर काही गोष्टी समजून मगच तो खरेदी करावा. जाणून घेऊया त्याबद्दल

Insurance Buying Tips
Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनला घरी जाण्यासाठी ट्रेन मिळत नाहीये? ही सोपी ट्रिक अन् तिकीट होईल कन्फर्म

1. पॉलिसी लिक्विडिटी

अनेक विमा पॉलिसी (Policy) लॉक-इन कालावधीसह येतात तर यावर लवकर पैसे काढण्याची मुभा आपल्याला मिळत नाही. त्यामुळे कोणातीही विमा पॉलिसी घेण्यापूर्वी त्यांच्या बद्दल योग्य ती माहिती काढून मगच तो खरेदी करा.

2. प्रतीक्षा कालावधी

जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स (Insurance) काढत असाल तर याचा कालावधी हा कंपन्यांद्वारे दिला जातो. जेव्हा तुम्ही कोणतीही विमा पॉलिसी विकत घेता तेव्हा त्याचा प्रतिक्षा कालावधी तपासा.

Insurance Buying Tips
EPFO Balance Check : Umang App वरुन मिनिटांत तपासा पीएफ खात्यातील रक्कम, कशी असेल प्रोसेस? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप

3. बोनसची अपेक्षा करू नका

कोणत्याही जीवन विमा पॉलिसीमधील बोनस कंपनीच्या (Company) नफ्यावर अवलंबून असतो. यामध्ये कोणत्याही प्रकारची हमी मिळत नाही. यामुळे जेव्हाही तुम्ही विमा पॉलिसी घेता तेव्हा एजंटने नमूद केलेल्या बोनसचा विचार शक्यतो करु नका.

4. दाव्याच्या अटींची तुलना करा

पहिल्या दोन आणि तीन वर्षांत, अनेक वेळा ग्राहकाने योग्य माहिती दिली नसल्यामुळे विमा कंपनीकडून पॉलिसीचा दावा नाकारला जातो. विमा कायदा 1938 चे कलम 45 पॉलिसी घेतल्यानंतर तीन वर्षांनी पॉलिसीधारकाचा दावा या कारणांमुळे नाकारण्यास प्रतिबंधित करते.

Insurance Buying Tips
EPFO सोबत मिळतो सात लाख रुपयांचा Insurance, जाणून घ्या संपूर्ण माहिती

5. वैशिष्ट्याची तुलना करा

बहुतेक लोक विम्याची तुलना करताना फक्त कव्हरेज आणि प्रीमियम पाहतात, परंतु असे करणे चुकीचे आहे. विमा घेताना त्यात उपलब्ध सुविधांचीही तुलना करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com