Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनला घरी जाण्यासाठी ट्रेन मिळत नाहीये? ही सोपी ट्रिक अन् तिकीट होईल कन्फर्म

IRCTC Confirm Railway Ticket : सणासुदीला रेल्वेचे तिकीट कसे बुक करायचे आणि वेळेवर घरी कसे पोहोचायचे यासाठी आम्ही तुम्हाला सोपी ट्रिक सांगणार आहोत
Raksha Bandhan 2023
Raksha Bandhan 2023Saam Tv
Published On

Confirm Railway Ticket : सणासुदीच्या काळात लांब पल्ल्याड ट्रेनचे तिकीट मिळणे कठीण होते. प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे तिकीट आधीच रिझर्व्हेशन केल्यामुळे फुल असतात. परंतु, शेवटच्या मिनिटाला तिकीट कन्फर्म होणे अगदीच कठीण.

जर तुम्हालाही घरी जाण्यासाठी ट्रेनचे तिकीट घेतले नसेल आणि तुम्हाला कन्फर्म तिकीट बुक करण्यासाठी अडचण येत असेल तर सणासुदीला रेल्वेचे तिकीट कसे बुक करायचे आणि वेळेवर घरी कसे पोहोचायचे यासाठी आम्ही तुम्हाला सोपी ट्रिक सांगणार आहोत. तिकीट बुक करण्यासाठी तुम्ही रेल्वेच्या अधिकृत अॅपला भेट देऊ शकता.

Raksha Bandhan 2023
Medical Facilities by Indian Railway: रेल्वे प्रवासादरम्यान तब्येत बिघडली तरी नो टेन्शन, ५० स्टेशन्सवर खास सुविधा उपलब्ध

1. तत्काळ तिकीट

रक्षाबंधनला सामान्य तिकीट मिळत नसेल तर तुम्ही तत्काळ तिकीट (Ticket) बुक करु शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही एजंटकडे जाण्याची किंवा त्यांना अतिरिक्त पैसे देण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या रेल्वे अॅपवरूनही तिकीट बुक करू शकता. या दिवसात रेल्वे तिकीटांची मागणी अधिक असते, त्यामुळे कन्फर्म तत्काळ तिकीटांचे बुकिंग करणेही अवघड काम होते. अशावेळी तुम्ही मास्टर लिस्ट वैशिष्ट्याची निवड करू शकता, ज्याच्या मदतीने आपले तिकीट लगेच कन्फर्म (Confirm) होईल.

2. रेल्वेचे मास्टर लिस्ट काय आहे?

मास्टर लिस्ट सुविधेमुळे IRCTC द्वारे तत्काळ तिकीट बुकिंग करता येते. AC वर्गांची बुकिंगची वेळ सकाळी 10:00 वाजता सुरू होते आणि स्लीपर क्लास सकाळी 11:00 वाजता सुरू होते. तिकीट बुक करण्याच्या एक दिवस आधी तुम्ही मास्टर लिस्ट बनवावी. यामुळे तत्काळ तिकीट बुक करणे सोपे होते.

Raksha Bandhan 2023
Raksha Bandhan Date 2023 : ७०० वर्षांनंतर पंचमहायोग! 30 की, 31 ऑगस्ट भावाला राखी कधी बांधायची? जाणून घ्या तिथी व शुभ मुहूर्त

3. मास्टर लिस्टचा उपयोग काय?

तुम्ही IRCTC वेबसाइट किंवा अॅपवर लॉग इन करून मास्टर लिस्ट तयार करू शकता. या यादीत तुम्हाला ज्या व्यक्तीचे तिकीट बुक करायचे आहे त्याचे वय, नाव, पत्ता, कुठे जायचे, आयडी प्रूफ इत्यादी भरावे आहेत. यासाठी तुम्हाला सामान्य व तत्काळ तिकीट दोघांचेही तिकीट भरावे लागेल. तत्काळ तिकीट खूप लवकर भरले जातात. अशावेळी जर आपण आपली तिकीटाची संपूर्ण माहिती आगाऊपणे भरली असेल तर तिकीट लगेच बुक होईल.

Raksha Bandhan 2023
Indian Railway Rules: गणपतीत कोकणात जायचा प्लान करताय? लोअर बर्थ सीट कशी मिळेल? जाणून घ्या रेल्वेचा नियम

4. मास्टर लिस्ट कशी बनवायची?

  • सर्वात आधी IRCTC वेबसाइटवर जा किंवा अधिकृत अॅप डाउनलोड करून लॉग इन करा.

  • यानंतर, अॅप किंवा वेबसाइटवरील 'माय अकाउंट' वर जा आणि 'माय प्रोफाइल' वर क्लिक करा.

  • तुम्हाला अॅप आणि वेबसाइट दोन्हीमध्ये 'Add/Modify Master List' चा पर्याय दिसेल.

  • येथे प्रवाशाचे नाव, वय, लिंग, जन्म निवड, आयडी प्रूफ यासंबंधीची माहिती भरावी लागेल. काही माहिती 'ऑप्शनल' असते. ती भरली नाही तरीही चालेल.

  • यानंतर तुम्हाला 'सबमिट' बटणावर क्लिक करावे लागेल.

  • अशा प्रकारे तुमची प्रवाशांची मास्टर लिस्ट तयार होईल.

  • तत्काळ बुकिंगच्या वेळी, तुम्ही ताबडतोब ट्रेन निवडू शकता आणि 'माय पॅसेंजर लिस्ट' वर क्लिक करू शकता. यासह, तुमचे सर्व तपशील 1 सेकंदात आपोआप मिळतील.

  • नंतर पेमेंट पर्यायांपैकी एक निवडा आणि पेमेंट करा.

  • लक्षात ठेवा ट्रेन बुक करण्यापूर्वी 1-2 दिवस आधी मास्टर लिस्ट तयार करा. जेणेकरून तुम्ही तत्काळ तिकीट बुक करता तेव्हा तुम्हाला 2-3 मिनिटांत कन्फर्म तिकीट मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com