NPS Scheme Saam Tv
बिझनेस

NPS Scheme: १.६२ कोटी रुपये एकरकमी अन् महिन्याला १ लाख रुपये पेन्शन; NPS योजना नक्की आहे तरी काय?

National Pension Scheme: नॅशनल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगलाच परतावा मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला एकरकमी १.६२ कोटी रुपये मिळणार आहेत. तुम्हाला महिन्याला १ लाख रुपये पेन्शन मिळू शकते.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक करत असतात. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि विविध योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. सरकारच्या अनेक योजनांमध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळतो. तुम्ही नॅशनल पेन्शन स्कीममध्ये गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला खूप जास्त परतावा मिळतो. या योजनेत तुम्हाला दर महिन्याला पेन्शनसोबत कोट्यवधी रुपये मिळतात.

नॅशनल पेन्शन स्कीममध्ये तुम्हाला महिन्याच्या गुंतवणूकीवर चांगला परतावा मिळतो. या योजनेत प्रायव्हेट आणि सरकारी कर्मचारी गुंतवणूक करु शकतात. या योजनेतील गुंतवणूकीमुळे तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला निश्चित पेन्शन मिळते. या योजनेत टॅक्सपासूनदेखील सूट मिळते. या योजनेतील रिटर्न हे मार्केटवर आधारित असतात.

एनपीएस अकाउंट हे पोर्टेबल आहे. या योजनेत तुम्ही देशात कुठूनही गुंतवणूक करु शकतात. या योजनेत रिटायरमेंटनंतर तुम्ही ६० टक्के रक्कम काढू शकतात. तर ४० टक्के पेन्शन योजनेत टाकले जातात. या योजनेत टियर १ आणि टियर २ मध्ये पैसे टाकले जाते.

एनपीएसमध्ये दर महिन्याला गुंतवणूक केली जाते. या योजनेत जर तुम्ही ४० वर्षांचे आहात तर पुढील २० वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला १ लाख रुपयांची पेन्शन मिळू शकते. या योजनेत तुम्हाला दर महिन्याला २० हजार रुपये टाकावे लागतील. या योजनेत दरवर्षी १० टक्के गुंतवणूक वाढवावी लागेल. म्हणजेच २० वर्षानंतर तुमच्याकडे ३ कोटी २३ लाख रुपये जमा होणार आहेत.

या योजनेत तुम्ही एकूण १.३७ कोटी रुपये गुंतवणूक कराल. त्यामध्ये ४१.२३ लाख रुपयांची टॅक्स सेव्हिंग होईल. तुम्हाला १.८५ कोटी रुपये परतावा मिळणार आहे.या योजनेत तुम्हाला पेन्शन वेल्थच्या अॅन्युटी प्लानमध्ये ५५ टक्के गुंतवणूक करावी लागेल. त्यावर ८ टक्के अॅन्युटी रेट मिळेल. यात पेन्शन वेल्थ १.६२ कोटी रुपये असेल. या योजनेत दर महिन्याला जवळपास १ लाख रुपये पेन्शन मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : बायपासवर भीषण अपघात! ३ वाहनांची जोरदार धडक, ४ जणांचा होरपळून मृत्यू

१६ महिन्यांत ३६ जणांना मृत्युदंड, 'त्या' न्यायाधीशांची तडकाफडकी कौटुंबिक न्यायालयात बदली

Maharashtra News Live Update: जुन्या कसारा घाटात वाहतूक कोंडी

Tikhat Sev Recipe: दिवाळीला फराळ करताना घरी बनवा कुरकुरीत आणि झणझणीत तिखट शेव, वाचा रेसिपी

Drinks for Liver Health: यकृतावर घाणेरडी चरबी जमा झालीये? हे ६ ड्रिंक्स लिव्हर डिटॉक्स करण्यास ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT