Noida News Saam Tv
बिझनेस

Noida News: व्हिला खरेदी करा अन् कोट्यवधींची लॅम्बोर्गिनी मोफत मिळवा; ऑफरची सगळीकडेच चर्चा

Noida Offer News: नोएडातील एका रिअल इस्टेट एजन्सीने एक भन्नाट ऑफर ग्राहकांना दिली आहे. २६ लाखांचा व्हिला खरेदी करा अन् लॅम्बोर्गिनी मोफत मिळवा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर रोज असंख्य पोस्ट व्हायरल होत असतात. नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यात एक विला खरेदी केल्यावर त्याला लंबोर्गिनी कार फ्री मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नोएडामधील रिअल इस्टेट जेपी ग्रीन्सने ही आकर्षक ऑफर दिली आहे.लक्झरी राहणीमान आणि कारची आवड असलेल्या श्रीमंत ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठ ही ऑफर देण्यात आली आहे.

नोएडामधील ही जाहिरात सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात २६ कोटींपासून सुरु होणाऱ्या विलाच्या खरेदीवर ही ऑफर देण्यात आली आहे. जे लोक हा अल्ट्रा प्रिमियम व्हिला खरेदी करतात, त्यांना ४ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची लॅम्बोर्गिनी उरूस मोफत मिळेल. ५१ लाख ते३० कोटी रुपयांचे व्हिला सध्या विक्रीसाठी उपलब्ध होत आहे.

गौरव गुप्ताने सोशल मीडियावर ही ऑफर शेअर केली आहे. त्यात २६ कोटींचा एक प्रोजेक्ट आहे. त्यात प्रत्येक व्हिलावर १ लॅम्बोर्गिनी मोफत ऑफर करत आहे, असं कॅप्शन दिले आहे.

रिअल इस्टेट कंपनीची ही ऑफर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आहे. ग्राहकांनी या प्रोजेक्टमध्ये जर व्हिला खरेदी केला तर त्यांना खूप फायदा होणार आहे. यानंतर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे. ही ऑफर कऱी आहे की नाही यावर अनेकांना विश्वास बसलेला नाही. हा एक स्टंट असल्याचे सोशल मीडियावर बोलले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: ठाकरे गट शिवसेनेला पालघर जिल्ह्यात खिंडार,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांनी सोडली पक्षाची साथ

Uddhav thackeray Speech : ही निवडणूक महाराष्ट्राचं गुजरातीकरण थांबवण्यासाठी; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली,VIDEO

Mill Worker: मुंबईचे गिरणी कामगार शेलू गावात विसावणार; 30 हजार जणांना मिळणार घरं

India Travel : परदेशी पर्यटकांना भारतातील 'या' शहराची भुरळ

Sharad Pawar Speech :...म्हणून शिवछत्रपतींचा अपमान झाला; शरद पवारांचा PM मोदींवर घणाघात,VIDEO

SCROLL FOR NEXT