प्रसिद्ध अभिनेत्याचे कार अपघातात निधन
वयाच्या ३१ व्या वर्षी अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास
मनोरंजन विश्वावर शोककळा
मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास आऊटर रिंग रोडवरील (ORR) एक्झिट १२ जवळील बेंगलुरु येथे एका भीषण रस्ते अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका टॉलिवूड अभिनेत्याचा आणि एका कॅमेरामनचा समावेश आहे. ते प्रवास करत असलेल्या कारने समोरून जाणाऱ्या एका ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
TOI च्या वृत्तानुसार, आदिबाटला पोलिसांनी सांगितले की, टॉलीवूड अभिनेत्याचे नाव भारत कांत असे आहे. तो ३१ वर्षांचा होता. तर त्रिलोक असे कॅमेरामनचे नाव आहे. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा आघात इतका तीव्र होता की, त्यांची कार पूर्णपणे चक्काचूर झाली होती. आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून हैदराबादकडे परतत असताना हा अपघात घडला. या दोघांनी शनिवारी रात्री आपला प्रवास सुरू केला होता. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास त्यांनी पेद्दाम्बरपेट येथून ORR वर प्रवेश केला आणि ते शमशाबादच्या दिशेने निघाले होते. हे दोघेही नानकरामगुडा येथे वास्तव्यास होते. मृतांचे मोबाईल फोन आणि त्यांच्या वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर या आधारे पोलिसांनी त्यांची ओळख पटवली.
तेलुगू अभिनेते आणि कंटेंट क्रिएटर के. भरत कांत यांचे ११ मे २०२६ रोजी एका भीषण कार अपघातात निधन झाले. भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळेच हा अपघात घडला असावा, असा पोलिसांना संशय आहे. अभिनेत्याच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच अभिनेत्यावर कलाकार आणि चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.