Rule Change Saam Tv
बिझनेस

Rule Change: पीएम किसान, LPG गॅस अन् आधार कार्ड; १ जानेवारीपासून हे महत्त्वाचे नियम बदलणार

Rule Change From 1st January 2026: १ जानेवारी २०२६ पासून अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. एलपीजी गॅस, आठवा वेतन आयोग आणि आधार पॅन कार्ड लिंकच्या नियमात बदल करण्यात आले आहेत.

Siddhi Hande

१ जानेवारी २०२६ होणार हे महत्त्वाचे बदल

पीएम किसान, आधार पॅन लिंकच्या नियमात बदल

सर्वसामान्यांवर होणार परिणाम

२०२५ संपायला अवघे २ दिवस उरले आहेत. २०२६ मध्ये अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत. पैशांसंबंधित अनेक नियमात बदल केले जाणार आहेत. यामुळे कर्मचारी, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यावर थेट परिणाम होणार आहे. १ जानेवारीपासून कोणते बदल होणार हे जाणून घ्या. (New Rules From 1st january 2026)

आठवा वेतन आयोग (8th Pay Commission)

१ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे. ३१ डिसेंबरपासून ७ वा वेतन आयोग संपणार आहे. दरम्यान, आठव्या वेतन आयोगाअंतर्गत पगारवाढ येण्यास उशिर होईल.

एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल (LPG Gas Price)

१ जानेवारी २०२६ पासून एलपीजी गॅसच्या किंमती बदलणार आहेत. दर महिन्याच्या १ तारखेला इंधनाच्या किंमतीत बदल होतात. त्यामुळे जानेवारीत एलपीजी गॅसच्या किंमती वाढ किंवा घट होऊ शकते.

आधार पॅन लिंकिंग (Aadhaar Pan Link)

आधार पॅन कार्ड लिंक करण्यासाठी शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. जर तुम्ही हे काम केले नाही तर १ जानेवारीपासून तुमचे पॅन कार्ड बंद केले जाणार आहे.

फार्मर आयडी (Farmer ID)

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य केले आहे. उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये फार्मर आयडी अनिवार्य केले आहे. संपूर्ण देशातदेखील फार्मर आयडी अनिवार्य केले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BCCI Central Contracts: रोहित-विराटला झटका तर गिलचं होणार प्रमोशन? बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टवर मोठी अपडेट

Maharashtra Live News Update: मनसेच्या उमेदवारांची यादी आजही जाहीर होणार नाही?

Namo Bharat : धक्कादायक! नमो भारत ट्रेनमधील 'त्या' कपलचा दुसरा व्हिडिओ व्हायरल

Aamir Khan-Kiran Rao : आमिर खानच्या दुसऱ्या बायकोवर झाली शस्त्रक्रिया, फोटो शेअर करत सांगितलं नेमकं काय झालं?

BMC Election: आधी स्वबळाची घोषणा, ऐनवेळी वंचितशी युती; BMCसाठी काँग्रेसला का हवी आंबेडकरांची साथ,नवी आघाडीची रणनीती काय?

SCROLL FOR NEXT