New Rules Saam Tv
बिझनेस

New Rule: LPG ते पेन्शन; १ डिसेंबरपासून महत्त्वाच्या नियमात बदल होणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम

New Rules From 1st December 2025: डिसेंबर महिना लवकरच सुरु होणार आहे. डिसेंबर महिन्यात पैशांसंबंधित अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. यामध्ये पेन्शनपासून ते एलपीजीच्या दरात बदल केले जाणार आहेत.

Siddhi Hande

सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी

१ डिसेंबरपासून बदलणार पैशांसंबंधित नियम

पेन्शन, एलपीजीचे नियम बदलणार

नोव्हेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. याचसोबत अनेक महत्त्वाची कामे करण्यासाठी डेडलाइन जवळ आली आहे. तुम्हाला ३० डिसेंबरपर्यंत काही कामे करणे अनिवार्य आहेत. जर तुम्ही ही कामे केली नाही तर तुम्हाला पुढच्या महिन्यात अनेक अडचणी येऊ शकतात. दरम्यान, १ डिसेंबरपासूनदेखील पैशांसंबंधित अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत.

यूनिफाइड पेन्शन स्कीम निवडण्याची शेवटची तारीख (Unified Pension Scheme)

सरकारी कर्मचाऱ्यांना यूनिफाइड पेन्शन स्कीम निवडण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. याआधी शेवटची तारीख ३० सप्टेंबर होती. आता दोन महिन्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे. १ डिसेंबरनंतर तुम्हाला यूपीएस निवडण्याची परवानगी नाहीये.

पेन्शनधारकांसाठी नियम (Pension Rule)

पेन्शनधाकांना दरवर्षी लाइफ सर्टिफिकेट जमा करावे लागते. यावर्षी ३० नोव्हेंबरपर्यंत तुम्ही लाइफ सर्टिफिकेट जमा करु शकतात. जर तुम्ही हे काम केले नाही तर तुम्हाला पेन्शन मिळणार नाही.

एलपीजी गॅसच्या किंमती (LPG Gas Price)

१ डिसेंबरपासून एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल होणार आहे. दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी गॅसचे नवे दर अपडेट होतात. डिसेंबरमध्येही गॅस दरात बदल होणार आहे.

एटीएफच्या दरात बदल (ATF Price)

ऑइल मार्केटिंग कंपन्या ATF (Aviation Turbine Fuel) मध्येही बदल करणार आहेत. १ डिसेंबरपासून एटीएफच्या किंमती बदलणार आहे. या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्र्यांच्या समोरच नवनीत राणा यांनी व्यक्त केली पुन्हा खासदार होण्याची इच्छा

Ajit Pawar: अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाची धडक, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Bharat Jadhav- Mahesh Manjrekar: भरत जाधव अन् महेश मांजरेकर पहिल्यांदाच एकत्र झळकणार, नवीन नाटकाचा प्रयोग कधी?

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींना मिळणार नाहीत ₹१५००; सरकारने दिला इशारा

पर्यटक तरूणीकडे आधी शरीरसंबंधाची मागणी, भररस्त्यावर हस्तमैथून; पीडितेनं VIDEO शूट करून व्हायरल केला, नेमकं घडलं काय?

SCROLL FOR NEXT