New Rules 2026 AI
बिझनेस

New Rules 2026: १ जानेवारी २०२६ पासून ६ नियम बदलणार, कर्मचाऱ्यांपासून ते शेतकऱ्यांवर होणार परिणाम, वाचा सविस्तर

Rule Change From 1st Janury 2026: नवीन वर्षात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. यामध्ये बँकेपासून ते सोशल मीडियाच्या नियमांचा समावेश आहे. यामुळे कर्मचारी ते शेतकऱ्यांवर परिणाम होणार आहे.

Siddhi Hande

२०२६ मध्ये बदलणार हे नियम

सरकारी कर्मचाऱ्यांपासून ते शेतकऱ्यांवर होणार परिणाम

बँक, सोशल मीडियाच्या नियमात बदल

नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहे. नवीन वर्षात अनेक बदल होणार आहे. १ जानेवारी २०२६ पासून पैशांसंबंधित अनेक नियम बदलणार आहेत. याचा थेट परिणाम कर्मचारी, स्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांवर होणार आहे. यामध्ये बँकेचे नियम, सोशल मीडियाबाबत नियम, इंधनाच्या किंमती यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

नवीन वर्षात अनेक नियम बदलले जातात. २०२६ मध्येही अनेक सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. सोशल मिडिया आणि डेटा सिक्युरिटीसाठी नवीन नियम लागू करण्याची शक्यता आहे.

बँकेच्या नियमांमध्ये बदल (Bank Rule)

बँकेच्या क्रेडिट स्कोअर अपडेटबाबत महत्त्वाचा बदल केला जाणार आहे. क्रेडिट ब्युरोंना आता दर १५ दिवसांनी न देता दर आठवड्याला डेटा रिफ्रेश करावा लागेल. यामुळे ही सुविधा अधिक सोपी होईल.

व्याजदरात बदल (Bank Interest Rate Rule)

स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक आणि एचडीएफसी बँकांनी कर्जावरील व्याजदर कमी केले आहे.या निर्णयाचा फायदा कर्जदारांना होणार आहे. तसेच सुधारित मुदत ठेव म्हणजे एफडीवरील नवीन व्याजदर २०२६ मध्ये लागू होणार आहे.

यूपीआयचे नियम (UPI Rule)

आता यूपीआय आणि डिजिटल पेमेंटबाबत अनेक नियम कडक केले आहे. तसेच पॅन आणि आधार लिंक करणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही हे काम केले नाही तर पॅन कार्ड बंद होऊ शकते. यामुळे बँकेच्या कामांमध्ये अडचणी येऊ शकतात.

सोशल मीडियाबाबत नियम

फसवणूक आणि गैवापार रोखण्यासाठी सोशल मीडियाबाबतचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. आता व्हॉट्सअॅप, सिग्नल, टेलिग्रामसाठी सिम कार्ड पडताळणीचे नियम कडक करण्यात आले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा

३१ डिसेंबरला ७वा वेतन आयोग संपणार आहे. यानंतर नवीन वेतन आयोग लागू होणार आहे. याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार आहे. याचसोबत जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना नवीन महागाई भत्ता मिळणार आहे.

शेतकऱ्यांसाठी नियम

आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे. जर आयडी नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mrunal Thakur: मराठमोळी थोडीशी साधीभोळी; धुळ्याची लेक पैठणीत दिसतेय लय भारी

Maharashtra Live News Update: स्वत:च्या फायद्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र, मनसे-शिवसेना युतीवर आशिष शेलारांची टीका

Vrishabh Hororscope 2026: अचानक धनलाभ होणार, पाहा कसं असेल वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी पुढचं वर्ष?

Lagnacha Shot: लग्नाचा शॉटमध्ये प्रियदर्शिनी- अभिजीत घालणार गोंधळ

Kitchen Hacks : मॉड्युलर किचन बनवत आहात, मग या गोष्टी लक्षात घ्या

SCROLL FOR NEXT