New Labour Rules Saam Tv
बिझनेस

New Labour Rules : पीएफ वाढणार, पण हातात येणार पगार कमी होणार, नव्या कामगार कायद्यामुळे CTC चं गणित बदलणार

New Labour Codes Reduce Labour Salary: केंद्र सरकारने ४ नवीन कामगार कायदे लागू केले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार कदाचित कमी होऊ शकतो. ग्रॅच्युइटी आणि पीएफमध्ये जमा केलेली रक्कम वाढू शकते.

Siddhi Hande

देशात नवीन कामगार कायदा लागू

पगाराच्या ५० टक्के रक्कम बेसिक सॅलरी म्हणून देणार

पीएफ आणि ग्रॅच्युइटीच्या रक्कमेत वाढ होणार

केंद्र सरकारने नवीन कामगार संहिता लागू केली आहे. यामध्ये आता ४ नवीन कायद्यांचा समावेश करण्यात आला आहे. या नवीन कायद्याचा थेट ४० कोटींपेक्षा जास्त कामगारांच्या आयुष्यावर परिणाम होणार आहे. यामध्ये किमान वेतन, नियुक्ती पत्र, ग्रॅच्युइटी यासंदर्भातील नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने कामगार कायद्यातील एकूण २९ कायदे रद्द केले आहेत. त्याजागी आता फक्त ४ कामगार संहिता लागू करण्यात आल्या आहेत. या नवीन संहितेमुळे कामागारांच्या पगारावरदेखील परिणाम होणार आहे.

नवीन कामगार कायद्यानुसार सॅलरी स्ट्रक्चर (New Labour Code)

देशात कालपासून कामगार कायद्यातील नवीन तरतूदी लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या किमान ५० टक्के रक्कम हे मूळ वेतन म्हणून द्यावे लागणार आहे. हा नियम कोड ऑफ वेजेजअंतर्गत लागू केला आहे. याचाच अर्थ असा की, पीएफ आणि ग्रॅच्युइटीमध्ये पैसे वाढणार आहेत.

पीएफ आणि ग्रॅच्युइटी मूळ पगारावर मोजली जाते. जेव्हा मूळ पगार वाढतो तेव्हा कर्मचारी आणि कंपनीचे पीएफ आणि ग्रॅच्युइटीमध्ये योगदान वाढेल. यामुळे निवृत्तीसाठी जमा होणारी रक्कम वाढणार आहे. परंतु टेक होम सॅलरी थोडसं कमी होऊ शकतो. दरम्यान, सीटीसीमध्ये बदल होणार नाही. परंतु ग्रॅच्युइटी आणि पीएफ वाढेल.

कंपन्यांना करावे लागणार नियमांचे पालन

केंद्र सरकारचा हा नियम कालपासून लागू झाला आहे. परंतु ४५ दिवसांत याबाबत नियम जाहीर करेल. त्यानंतर कंपन्याना या नियमांचे पालन करावे लागणार आहे. यानंतर पगाराच्या रचनेत बदल करावे लागतील.

कंपन्याना मूळ वेतन कमी ठेवण्यापासून आणि भत्ते वाढवून पीएफ आणि ग्रॅच्युइटीमध्ये त्यांचे योगदान कमी करता येऊ नये, यासाठी हे नियम लागू करण्यात आला आहे. सध्या मूळ वेतनातून १२ टक्के पीएफ कापला जातो.

कंपन्या मूळ पगार कमी ठेवतात आणि भत्ते वाढवतात. यामुळे पीएफ आणि ग्रॅच्युइटीमधील योगदान कमी व्हायचे. यामुळे आता सरकारने सीटीसीचा अर्धा भाग मूळ पगार असला पाहिजे, असा नियम लागू केला आहे. यामुळे निवृत्तीसाठी जास्त बचत होईल. परंतु यामुळे मासिक पगार कमी होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्य प्रदेशातील गुलाबी थंडी, गाव झोपेत अन् छापेमारीचा धडका, पुणे पोलिसांचे "ऑपरेशन उमरती" यशस्वी

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा,युरियासाठी शेतकऱ्यांच्या खत विक्री केंद्रावर रांगा

Mumbai Fire: झोपडपट्टीला भीषण आग, १५ झोपड्या जळून खाक|VIDEO

शिंदेसेनेच्या आमदाराकडून भाजप नेत्याला धमकी; राजकारण तापलं, नेमकं घडलं काय?

सेल्फीचा मोह जीवावर बेतला, तरुण थेट नदीत पडला|VIDEO

SCROLL FOR NEXT