New Labour Law Saam Tv
बिझनेस

New Labour Law: कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता एप्रिलचा पगार येणार कमी; मार्चपेक्षा जास्त पैसे कापले जाणार; कारण काय?

April Salary will Get Less: कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार कमी येणार आहे. पगारात मार्चपेक्षा जास्त पैसे कापले जाणार आहेत. यामागचे कारण काय ते जाणून घ्या.

Siddhi Hande

कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांना आता एप्रिल महिन्यात मार्चपेक्षा कमी पगार मिळणार आहे. १ एप्रिलपासून लागू झालेल्या नवीन कामगार कायद्यात बदल करण्यात आले. यामध्ये वेतन रचनेतदेखील बदल करण्यात आले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यात कमी पगार मिळणार आहे.

आता नवीन कामगार कायद्याअंतर्गत कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ही एकूण पगाराच्या ५० टक्के असणे अनिवार्य आहे. याआधी २० किंवा ३० टक्के होती. यामुळे तुमचे पीएफचे पैसे जास्त कट होती. पीएफ हा बेसिक सॅलरीवर अवलंबून असतो. परंतु आता पीएफ जास्त कट झाल्याने कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार कमी होणार आहे. त्यामुळेच एप्रिलमध्ये कर्मचाऱ्यांच्या हातात कमी पगार येणार आहे.

सरकारने नवीन Code on Wages 2019 आणि Code on Social Security 2020 लागू केले आहेत. सॅलरीत बदल करण्यात आले आहेत. या नवीन नियम बेसिक सॅलरी सीटीसीच्या निम्मी म्हणजे ५० टक्के असणे अनिवार्य आहे.

याआधी काय होते नियम?

जुन्या नियमांनुसार, बेसिक सॅलरी खूप कमी असायची. काही ठिकाणी एकूण पगाराच्या २० ते ३० टक्के बेसिक सॅलरी दिली जायची. बाकी रक्कम एचआरए, स्पेशल अलाउंट, एलटीसी आणि इतर भत्त्यांमध्ये दिली जायची. त्यामुळे कर्मचाऱ्यांना इन हँड सॅलरी जास्त मिळायची. तेव्हा पीएफ आणि ग्रॅच्युटीमध्ये बेसिक सॅलरीच्या आधारे पैसे जमा केले जायचे. त्यामुळे हे पैसे कमी जमा व्हायचे.

आता नियमात काय बदलले? (New Labour Law)

नवीन नियमांनुसार, आता पगारातील ५० टक्के रक्कम बेसिक सॅलरी असणार आहे. त्यामुळे तुमचे पीएफ आणि ग्रॅच्युटी फंडमध्ये जास्त योगदान जमा होणार आहे. पगारातील बेसिक सॅलरीमधील १२ टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा करावी लागते.

उदाहरणार्थ जर तुमचा एकूण पगार १ लाख रुपये असेल तर त्याची बेसिक सॅलरी ५०,००० रुपये असणार आहे. त्यातील १२ टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. त्यामुळे ६००० रुपये पीएफ खात्यात जमा केली जाणार आहे. यामुळे पीएफमधील योगदान वाढणार आणि एकूण पगार कमी येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT