New Labour Code Saam Tv
बिझनेस

New Labour Law: आता नोकरी सोडल्यावर २ दिवसात मिळणार पूर्ण पैसे, काय आहे नवीन नियम?

New Labour Law: नवीन कामगार कायदा लागू झाला आहे. यानुसार नोकरी सोडल्यानंतर २ दिवसात फुल अँड फायनल सेटलमेंट मिळणार आहे.

Siddhi Hande

१ एप्रिलपासून नवीन कामगार कायदा

नोकरी सोडल्यानंतर दोन दिवसात मिळणार पूर्ण पैसै

फूल अँड फायनल सेटलमेंटसाठी २ दिवसांचा कालावधी

१ एप्रिलपासून नवीन कामगार कायदा लागू झाला आहे. यामुळे कामगारांना फायदा होणार आहे. आता नोकरी सोडल्यानंतर कर्मचाऱ्यांना दोन दिवसात फायनल सेटलमेंट मिळणार आहे. या कर्मचाऱ्यांना पूर्ण पैसे मिळणार आहे. याआधी नोकरी सोडल्यानंतर कर्मचाऱ्यांना पैसे मिळण्यासाठी ४० ते ४५ दिवसांची वाट पाहावी लागायची. परंतु आता या नवीन कामगार कायद्यामुळे फायदा होणार आहे.

सरकारने नवीन कामगार कायदा लागू केला आहे. याअंतर्गत तुम्हाला पूर्ण पैसे दोन दिवसात मिळणार आहेत. त्यांना आता पैसे मिळण्यासाठी जास्त दिवसांची वाट पाहावी लागणार नाही.

काय आहे नवीन नियम?(What Is New Labour Code)

१ एप्रिल २०२६ पासून लागू झालेल्या नवीन नियामनुसार, कंपन्यांना कर्मचाऱ्यांसाठीच्या फायनल सेटलमेंटचे काम दोन दिवसात पूर्ण करायचे आहे. हा नियम वेतन संहिता २०१९ अंतर्गत लागू करण्यात आला आहे. या नवीन तरतुदीनुसार, जर एखाद्याने कंपनी सोडली किंवा त्याला कामावरुन काढून टाकले तर कंपनीने दोन दिवसात फायनल सेटलमेंट करायची आहे. या प्रक्रियेला ३० ते ९० दिवस लागायचे.

फूल अँड फायनल सेटलमेंट म्हणजे काय? (Full and Final Settelment After Job)

फूल अँड फायनल सेटलमेंट म्हणजे नोकरी सोडल्यानंतर कर्मचाऱ्याला देय असलेल्या रक्कमेची गणना करणा आणि ती कर्मचाऱ्यांना देणे. यामध्ये पगार, भत्ता आणि इतर सुविधांचा समावेश आहे.

फायनल सेटलमेंटमध्ये काय असतं?

मागील महिन्याचा पगार, काम केलेल्या दिवसांवर आधारित पगार मिळणार आहे. कामगिरीनुसार बोनस आणि प्रोत्साहनची रक्कम मिळणार आहे. आता कर्मचाऱ्याला १ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ग्रॅच्युटी मिळते. हे पैसे ३० दिवसांच्या आत दिले जाणार आहे.यामुळे कर्मचाऱ्यांना दोन दिवसात सर्व पैसे मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT