New Labour Law Saam tv
बिझनेस

New Labour Law: पगार, सुट्ट्या अन् ग्रॅच्युइटीसाठी नवे नियम; २९ नव्हे तर आता फक्त ४ कामगार कायदे

New Labour Law Implemented From Today: केंद्र सरकारने कामगार कायद्याच्या नियमात बदल केले आहेत. आता ४ नवीन कायदे आणले आहेत. यामध्ये किमान वेतन, ग्रॅच्युइटी, पगार यांच्या नियमांत बदल केले आहेत.

Siddhi Hande

देशात नवीन कामगार कायदे लागू

२९ ऐवजी ४ नवीन संहिता लागू करण्याचा निर्णय

किमान वेतन, निवृत्ती ते ग्रॅच्युइटीच्या नियमांत बदल

केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने कामगार कायद्यात महत्त्वाचे बदल केले असून चार नवे कायदे लागू केले आहेत. आजपासून हे कायदे लागू झाले आहे. या नवीन कायद्यांमध्ये अनेक बदल झाले आहेत. या नवीन कायद्यांमध्ये कामगारांना सुरक्षा आणि वेतनाची हमी दिली जाते. हे नवीन कायदे लागू झाल्यामुळे जुने २९ कायदे रद्द करण्यात आले आहेत.

याबाबत कामगार मंत्री मानसुख मांडविया यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की त्यात नवीन वेतन संहिता (2019), औद्योगिक संबंध संहिता (2020), सामाजिक सुरक्षा संहिता (2020) आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची परिस्थिति संहिता (2020) यांचा समावेश आहे. लिंगभेद रहित धोरणे, 2 सदस्यीय लवादांमार्फत जलद तंटा निवारण अशा तरतुदी नव्या कायद्यांत आहेत.

नवीन कामगार कायदे (4 New Labour Codes Effective From Today)

1.कामाचे तास वाढले

नवीन कामगार कायद्यात आता कामाचे तास वाढले आहेत. दिवसाला ८ ते१२ तास काम तर आठवड्याला ४८ तास काम करावे लागणार आहे. हा नियम विडी आणि खाण कामगारांसाठी आहे. या कामगारांनी वर्षातून फक्त ३० दिवस काम केले तरी त्यांना बोनस द्यावा लागणार आहे.

2. नियुक्ती पत्र

आता सर्व कामागारांना नोकरीला लागल्यावर नियुक्ती पत्र देणे बंधनकारक केले आहे. यामुळे रोजगारांच्या अटींमध्ये पारदर्शकता वाढेल. यामुळे कामगारांनाच फायदा होणार आहे.

3. किमान वेतन

आता कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्यावे लागणार आहे. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारात कोणतीही तफावत जाणवणार नाही.

4. वेळेवर पगार

कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देणे अनिवार्य असणार आहे.आयटी व आयटी एनेबल्ड सर्व्हिसेस या क्षेत्रातील कंपन्यांना कर्मचाऱ्यांचा पगार 7 तारखेच्या आत देणे बंधनकारक असेल.

5. महिलांसाठी बदल

महिलांना आता रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्यासाठी परवानगी असेल. यासाठी नियोक्त्याला सुरक्षा उपाययोजना आणि त्यांची परवानगी असणे गरजेचे आहे.

6. गिग वर्कर्स

गिग वर्कर्स आणि प्लॅटफॉर्म वर्कर्संना कायदेशीररित्या ओळख मिळणार आहे. त्यांना पीएम, विमा, निवृत्ती वेतन या गोष्टींचा फायदा मिळणार आहे.

7.आरोग्य तपासणी

४० वर्षांवरील सर्व कामगारांना मोफत आरोग्य तपासणी केली जाईल. तसेच राष्ट्रीय OSH बोर्डाद्वारे उद्योगांमधील सुरक्षा मानके एकसमान केली जातील.

8.ग्रॅच्युइटी

आता कामगारांना एका वर्षातच ग्रॅच्युइटीचा फायदा घेता येणार आहे. याआधी पाच वर्षे सर्व्हिस केल्यानंतर ग्रॅच्युइटी मिळत होती. आता हा कालावधी कमी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवारांच्या आमदारावर अटकेची टांगती तलवार? राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Success Story: १० बाय १०च्या खोलीत फुलवली केशरची शेती, संभाजीनगरच्या लेकीचा यशस्वी प्रयोग

Maharashtra Politics: बड्या नेत्यांना हवं भाजपचं वाशिंग मशिन? मित्र पक्षांनाही भाजपची भुरळ

Maharashtra Live News Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

Honeymoon Spot : कुठं कुठं जायाचं हनिमूनला? 'हे' आहे भारतातील बेस्ट लोकेशन, येथे जाताच स्वित्झर्लंड विसराल

SCROLL FOR NEXT