Union Budget 2025 Saam Tv
बिझनेस

Union Budget 2025: नवीन इन्कम टॅक्स बिल पुढच्या आठवड्यात; अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची मोठी घोषणा

New Income Tax Bill Announcement Union Budget : अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पाबाबत मोठी घोषणा केली आहे. नवीन इन्कम टॅक्स विधेयक पुढच्या आठवड्यात मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Siddhi Hande

केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत आहे. अर्थसंकल्पात आयकराबत मोठी घोषणा करण्यात येणार आहे. पुढच्या आठवड्यात नवीन आयकर विधेयक मांडणार अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी सांगितली आहे. (Union Budget 2025)

आजच्या अर्थसंकल्पाकडून करदात्यांना खूप अपेक्षा होत्या. टॅक्स स्लॅब वाढवण्याची मागणी केली जात होती. पुढच्या आठवड्यात जेव्हा नवीन आयकर विधेयक मांडतील, त्यामध्ये याबाबत माहिती दिली जाईल.

अर्थमंत्री निर्मला सितारामन या पुढच्या आठवड्यात नवीन टॅक्स बिल मांडणार आहे. हे बिल मांडल्यानंतर काही दिवसातच नवीन कर प्रणाली लागू केली जाईल. दरम्यान, नुकतीच अर्थमंत्र्यांनी १२ लाखांचे उत्पन्न करमुक्त होणार अशी घोषणा केली आहे.त्याचसोबत स्टँडर्ड डिडक्शन ७५००० रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे करदात्यांना काहीसा मिळाला आहे.

आता पुढच्या आठवड्यात जे नवीन विधेयक मांडण्यात येणार आहे त्यात काय बदल होणार हे समजणार आहे. (Union Budget News)

नवीन कर प्रणाली कशी असणार? (New Tax Regime)

नवीन कर प्रणालीत ०-४ लाखांवर तुम्हाला कर भरावा लागणार नाही. ४-८ लाखांवर ५ टक्के कर भरावा लागेल. ८-१२ लाखांच्या उत्पन्नावर १० टक्के कर भरावा लागेल.१२ ते १६ लाखांच्या उत्पन्नावर १५ टक्के कर लागू होणार आहे. २० ते २४ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २५ टक्के कर लागणार आहे. तर २४ लाखांच्या वरील उत्पन्नावर ३० टक्के कर लागणर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जम्मू- कश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT