

चहातील कॅफिनमुळे भूक काही वेळासाठी लागत नाही
काळा चहा ग्रीन टीपेक्षा भूक अधिक नियंत्रणात राहत नाही
हर्बल चहा प्यायल्याने पचक्रिया सुरळीत होते.
भारतात चहाप्रेमींची संख्या लाखोंवर आहे. देशातील प्रत्येक घरात एकतरी चहाप्रेमी असतो. अनेकांची सुरुवात चहाने होते. अनेक ऑफिसमध्ये चहा पिताना गप्पा करतानाही दिसतात. परंतु याच चहाने भूक मरते. ही बाब एका रिसर्चमधून समोर आलं आहे.
समाजातील अनेक वृद्ध व्यक्ती, चहामुळे भूक मरते, असं सांगत असतात. अनेकांना ही बाब खरी वाटत नाही. यावर डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट दिव्या गांधी यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे.
रिसर्चनुसार, चहा प्यायल्याने भूक मरते. खरंतर चहा प्यायल्याने तासंतास भूक लागत नाही. चहामध्ये कॅफिन असल्याने त्यामुळे भूक कमी लागते.
काही अभ्यासानुसार, कॅफिन असणारे पेय प्यायल्याने भूक काही प्रमाणात कमी होते. यामुळे कॅलरी बर्न देखील होते. परंतु चहा पिणे आणि जेवण न केल्याने वजन कमी होणे, अशी शक्यता कमी असते. त्यासाठी जोडीला व्यायाम असणे गरजेचे आहे.
काळा चहा प्यायल्याने भूक काही वेळासाठी कमी होते. परंतु काही वेळाने पुन्हा भूक लागू शकते. काळा चहा रोज पिऊ शकतो.
'ग्रीन टी'मध्ये कॅफिन असते. परंतु त्यात कॅफिनची मात्रा कमी असते. 'ग्रीन टी' प्यायल्याने त्याचा परिणाम थोडा वेळ दिसतो.
कॅफिन नसलेला हर्बल चहामध्ये पुदीना, आलं, लेमनग्रास इत्यादी. यामुळे भूक कमी होत नाही. तर परंतु पचनक्रिया सुरळीत होते.
चहा प्यायल्याने भूक मरते का?
हो. रिसर्चनुसार चहामध्ये असलेल्या कॅफिनमुळे काही वेळासाठी भूक कमी जाणवण्याची शक्यता असते. त्याचा परिणाम तात्पुरता असतो.
काळा चहा आणि 'ग्रीन टी'मध्ये काय फरक असतो?
काळ्या चहामध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते. तर 'ग्रीन टी'मध्ये कॅफिन कमी प्रमाणात असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.