Naturals Success Story Saam Tv
बिझनेस

Naturals Success Story: २०० फूट जागेत सुरु केला व्यवसाय आज आहे ४०० कोटींची कंपनी; फळविक्रेत्याच्या मुलाच्या यशाची कहाणी वाचाच

Naturals Owner Success Story: नॅचरल्स ब्रँडचे आइस्क्रिम सर्वांनीच खाल्ले असतील. नॅचरल्स ब्रँडची सुरुवात २०० फूट लहान खोलीतून झाली आहे.

Siddhi Hande

देशातील अनेक तरुणांना स्वतःचा व्यवासय सुरु करायचा असतो. स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी चांगली आयडिया आणि भांडवल हे खूप महत्त्वाचे असते. बाजारात आपले प्रोडक्ट विकले जाईल का? आपल्या प्रोडक्टमध्ये असं काय वेगळं आहे की जेणेकरुन लोक ते विकत घेतील, या सर्व गोष्टींचा विचार करुन व्यवसाय सुरु करायचा असतो. अशीच एक आयडिया रघुनंदर श्रिनिवास कामत यांना आली. वडिल फळ विकायचे, त्यातूनत त्यांना कल्पना सूचली आणि त्यांनी स्वतः चा व्यवसाय सुरु केला.

१९८४ मध्ये रघुनंदन श्रीनिवास कामत यांनी नॅचरल्स आइस्क्रिम ब्रँडची सुरुवात केली. रघुनंदन यांचे वडील कर्नाटक येथे आंबे विकायचे. वडिलांकडूनच त्यांनी चांगली फळे कशी निवडायची, चांगली फळे कशी असतात याची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी वडिलांसोबत राहून चांगली फळे निवडणे, ती उत्तमरितीने प्रीजर्व्ड करायचा शिकले. त्यानंतर त्यांनी आपल्या बिझनेसची प्लानिंग केली. (Naturals Owner Success Story)

रघुनंदन यांनी मुंबईतील जुहू येथे नॅचरल्सचे पहिले दुकान सुरु केले. तेव्हा त्यांच्याकडे फक्त ४ लोक कामासाठी होते. दहा आइस्क्रिम फ्लेवर्ससह त्यांनी हे शॉप ओपन केले.परंतु त्यांच्या शॉपमध्ये सुरुवातीला ग्राहक येत नव्हते. त्यामुळे त्यांनी पावभाजी विकण्यास सुरुवात केली.

आइस्क्रिमसोबत विकली पावभाजी

रघुनंदन यांच्या नॅचरल्स आइस्क्रिम पार्लरमध्ये जास्त ग्राहक येत नव्हते. त्यामुळे त्यांनी सोबतच पावभाजी विकण्याचा निर्णय घेतला. पावभाजी खाऊन झाल्यावर लोकांना तिखट लागायचे. त्यामुळे ते आइस्क्रिम खायचे. रघुनंदन यांची आइस्क्रिम फक्त दूध, फळ आणि साखरेपासून बनवलेली असायची. त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ नसायची. त्यामुळे लोकांचा विश्वास वाढू लागला.हळूहळू नॅचरल्स आइस्क्रिम पार्लरमध्ये ग्राहकांची संख्या वाढली. (Naturals Icecream Brand Success Story)

रघुनंदन यांनी २०० फीट जागेत स्वतः चे पहिले दुकान सुरु केले. त्यानंतर त्यांनी आपल्या बिझनेसचा विस्तार केला. आइस्क्रिमच्या फ्लेवर्समध्ये वाढ केली. आज नॅचरल्सचे देशभरात १३५ पेक्षा जास्त आउटलेट आहेत. २० पेक्षा जास्त आइस्क्रिम फ्लेवर्स या शॉपरमध्ये मिळतात. या ब्रँडने ४०० कोटींचा टर्नओव्हर पास केला आहे. (Raghunansan Srinivas Kamat Success Story)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: ३ दिवसांपासून शिंदे शहांच्या दारात, शिवसेना नावाला कलंक लावला - संजय राऊथ

Jalna News : जालन्यातील धांडेगावचे ग्रामस्थ टाकणार मतदानावर बहिष्कार; रस्त्याच्या प्रश्नासाठी ग्रामस्थ आक्रमक

Government Job: समाज कल्याण आयुक्तालयात नोकरीची संधी; २१९ जागांवर भरती; पात्रता काय? जाणून घ्या

David Warner: डेव्हिड वॉर्नरवरील लाईफटाईम बॅन हटवला! आता कर्णधार होण्यासही सज्ज

NCP Ajit Pawar : अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर; सात नावांचा समावेश

SCROLL FOR NEXT