राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकप शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत मिळणारे वार्षिक ६००० रुपये काही काळासाठी मिळणार नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ५६ लाख शेतकरी बाद होऊ शकतात.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्य सरकारने १५ जून २०२३ रोजी सुरू केली होती. ही योजना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली असून, पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी २,००० रुपये, म्हणजेच एकूण ६,००० रुपये दिले जातात.
मात्र, राज्य सरकारने नुकतीच जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून एका वर्षासाठी वगळण्याचा विचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.कर्जमाफीमुळे सरकारवर वाढलेल्या आर्थिक भारामुळे हा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे.
आतापर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत ९३.०८ लाख शेतकऱ्यांना आठ हप्त्यांमध्ये १४,८१६ कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. मात्र २०२६ ते २०२७ या आर्थिक वर्षातल्या डिसेंबर-मार्च आणि एप्रिल- जुलै या दोन हप्त्यांचे वितरण अद्याप झालेले नाही. त्यासाठी कृषी आयुक्तालयाने सरकारडे निधीचा प्रस्ताव पाठवला आहे.
दरम्यान, राज्यातल्या काही भागात पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांची चिंता वाढली आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात पिकांना पावसाची गरज असून, संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीमुळे कृषी विभागावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. यामुळे २५ हजार रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ सुरू ठेवता येईल का? याबद्दल कृषी विभागात चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. पण याबद्दल सरकारकडून अजून अधिकृत घोषणा जाहीर करण्यात आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.