8th Pay Commission Delay: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 8वा वेतन आयोग लांबल्यास किती मिळू शकतो एरियर? वाचा कॅलक्युलेशन

8th Pay Commission Arrears: आठव्या वेतन आयोगाला उशीर झाल्यावर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा एरियर मिळण्याची शक्यता आहे. लेव्हल ६ ते ८ कर्मचाऱ्यांसाठी फिटमेंट फॅक्टरनुसार संभाव्य एरियरचे गणित जाणून घ्या.
8th Pay Commission
8th Pay Commission meta ai
Published On: 

सरकारी कर्मचारी आणि आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी आणि नव्या वेतनाची केंद्रीय कर्मचारी आतुरचेने वाट पाहतायेत. आयोगाच्या अहवालाला किंवा शिफारशींच्या अंमलबजावणीला उशीर झाल्यावर कर्मचाऱ्यांना एरियर मिळण्याची शक्यता असते. पण एरियरची नेमकी रक्कम नवीन बेसिक पे, फिटमेंट फॅक्टर आणि वेतनवाढ कोणत्या प्रभावी तारखेपासून लागू होते, यावर अवलंबून असेल.

आठव्या वेतन आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी दिला आहे. त्यामुळे सध्याच्या वेळापत्रकानुसार अहवाल मे २०२७ च्या आसपास येण्याची शक्यता आहे. पण आयोगाला गरज असेल तर जास्तीचा वेळ मागता येऊ शकतो. त्यामुळे अंतिम तारीख ठरलेली असल्याचं मानता येणार नाही.

8th Pay Commission
RBI Repo Rate Hike: होम लोन घेणाऱ्यांचे टेन्शन वाढलं, EMI वाढण्याची शक्यता; RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

लेव्हल ६ कर्मचाऱ्यांचे संभाव्य एरियर

लेव्हल ६ ची सध्याची बेसिक सॅलरी ३५,४०० रुपये असल्याचं गृहीत धरल्याने, २.१५ फिटमेंट फॅक्टरनुसार नवीन बेसिक पे ७६,११० रुपये होऊ शकतो. या अंदाजानुसार २० महिन्यांच्या उशीरासाठी ८.१४ लाख रुपये, तर २४ महिन्यांसाठी ९.७७ लाखांचा एरियर होऊ शकतो. २.५७ फिटमेंट फॅक्टर गृहीत धरल्याने २४ महिन्यांचा एरियर सुमारे १३.३४ लाखांपर्यंत जाऊ शकतो.

8th Pay Commission
Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! जुनी पेन्शनचा मार्ग मोकळा, अर्जाची शेवटची तारीख समोर

लेव्हल ७ मध्ये किती एरियर?

लेव्हल ७ ची बेसिक सॅलरी ४४,९०० मानल्यावर, २.१५ फिटमेंट फॅक्टरनुसार २४ महिन्यांचा संभाव्य एरियर सुमारे १२.३९ लाख होऊ शकतो. २.५७ फिटमेंट फॅक्टरनुसार ही रक्कम सुमारे १६.९२ लाखांपर्यंत जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com